Thane: ठाणेकर लाडक्या बहिणीं अर्जासाठी सेतूच्या रांगेत ताटकळत!

By सुरेश लोखंडे | Published: July 2, 2024 07:36 PM2024-07-02T19:36:29+5:302024-07-02T19:36:53+5:30

Thane News: राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही याेजना महिलांसाठी लागू केली आहे. त्यापाेटी दरमहा दीड हजार रूपये मिळणार आहे. या रकमेचा लाभ मिळावा यासाठी ठाणे तहसीलदार कार्यालयाजवळील सेतू कायार्लयाच्या खिडकीवर अर्ज घेण्यासाठी शेकडाे ठाणेकर बहिणींनी आज सकाळपासून एकच गर्दी केली.

Thane: Thanekar's beloved sisters are waiting in the bridge queue for application! | Thane: ठाणेकर लाडक्या बहिणीं अर्जासाठी सेतूच्या रांगेत ताटकळत!

Thane: ठाणेकर लाडक्या बहिणीं अर्जासाठी सेतूच्या रांगेत ताटकळत!

- सुरेश लोखंडे
ठाणे  - राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही याेजना महिलांसाठी लागू केली आहे. त्यापाेटी दरमहा दीड हजार रूपये मिळणार आहे. या रकमेचा लाभ मिळावा यासाठी ठाणे तहसीलदार कार्यालयाजवळील सेतू कायार्लयाच्या खिडकीवर अर्ज घेण्यासाठी शेकडाे ठाणेकर बहिणींनी आज सकाळपासून एकच गर्दी केली. या याेजनेचा अर्ज एकाच खिडकीवर वाटप हाेत असल्यामुळे ही रांग पुढ सरकत नसल्यामुळे महिला तासनतास एकाच ठिकाणी ताटकळत उभ्या असल्याचे वास्तव मंगळवारी पहायला मिळाले.

 ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही याेजना अवघ्या एका दिवसातच लाेकप्रिय झाली. या याेजनेव्दारे दरमहा दीड हजार रूपये मिळणार असल्यामुळे पात्र महिलांनी येथील बाजारपेठेतील तहसीलदार कार्यालयाच्या सेतूवर गर्दी केली. सेतूच्या खिडकीपासून ते या प्रांगणाच्या प्रवेशव्दारापर्यंत असलेल्या महिलांची रांग सर्वाचे लक्ष वेधून घेत हाेती. अर्ज वाटपाचा आज दुसरा दिसून असूनही गर्दी वाढलेली हाेती. पहिल्या दिवशी दीड हजार पेक्षा जास्त अर्ज वाटप झाले. आजची गर्दी बघता दाेन ते तीन हजार अर्ज वाटप करावे लागणार असल्याचे या सेतू कार्यालयाचे निशांत मांबळे यांनी लाेकमतला सांगितले. उत्पान्नाचा दाखला आणि रहिवाशी दाखल्यासाठी या महिलांकडून या खिडकीवर गर्दी केली हाेती.

या याेजनेसाठी दाेन लाख ५० हजार पेक्षा कमी उत्पन्न असायला हवे व महाराष्ट्राचा रहिवाशी असलेले आदिवास दाखला लागत आहे. त्यासाठी ही गर्दी झाली. अर्ज दाखल करण्याची मुदत १५ जूनपयंत असल्याचे लक्षात घेऊन ठाणेकर महिलांनी सेतू कार्यालयात एकच गर्दी केली. पण ही मुदत वाढ मिळणार असल्याचे ऐकायला मिळत असतानाही महिला अर्जासाठी रांगेत ताटकळत हाेत्या. या गर्दीस अनुसरून ठाणे शहरातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक ठाणे तहसीलदारांनी सायंकाळी बाेलून त्यांच्या कार्यालयांमध्ये या दाखल्यांसाठी शिबीर लावण्यास अनुसरून चर्चा झाल्याचे मांबळे यांनी सांगितले. अर्ज घेण्यासाठी ऐवढी गर्दी झाली असून दाखले घेण्यासाठी या महिलांची गर्दी वाढणार आहे. त्यावर वेळीच मात करण्यासाठी ठिकठिकाणी दाखले वाटप शिबीर लावून त्वरीत अर्ज देण्चयाचे नियाेजन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. त्यासाठी राजकीय पक्ष व त्यांच्या कार्यालय प्रतिनिधीचे सहकार्य घेतले जाणार असल्याची चर्चा आहे.

Web Title: Thane: Thanekar's beloved sisters are waiting in the bridge queue for application!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.