Thane: तानसा धरण भरण्याची शक्यता; नदी काठावरील गांवपाड्यांना दक्ष राहण्याचे आवाहन

By सुरेश लोखंडे | Published: July 22, 2024 11:09 PM2024-07-22T23:09:21+5:302024-07-22T23:09:39+5:30

Thane News: बृहनमुंबई महानगरपालिकेच्या तानसा धरणाची पातळी १२७.५१ मी.मी. टिएचडी इतकी आहे. तानसा धरण ओसंडून वाहण्याची पातळी १२८.६३ मी.टीएचडी इतकी आहे. तनसा धरण परिसरात सतत पर्जन्यवृष्टी होत असल्यामुळे हे धरण काेणत्याही क्षणी भरण्याची दाट शक्यता आहे.

Thane: Thansa dam likely to fill; Villagers on the banks of the river are urged to be vigilant | Thane: तानसा धरण भरण्याची शक्यता; नदी काठावरील गांवपाड्यांना दक्ष राहण्याचे आवाहन

Thane: तानसा धरण भरण्याची शक्यता; नदी काठावरील गांवपाड्यांना दक्ष राहण्याचे आवाहन

- सुरेश लोखंडे 
ठाणे - बृहनमुंबई महानगरपालिकेच्या तानसा धरणाची पातळी १२७.५१ मी.मी. टिएचडी इतकी आहे. तानसा धरण ओसंडून वाहण्याची पातळी १२८.६३ मी.टीएचडी इतकी आहे. तनसा धरण परिसरात सतत पर्जन्यवृष्टी होत असल्यामुळे हे धरण काेणत्याही क्षणी भरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तानसा धरणाखालील व तानसा नदीलगतच्या, आजूबाजूच्या परिसरातील गांवपाड्यांना दक्षता घेण्याचे आवाहन सज्ज झालेल्या प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

या तानसा धरणाखालील व तानसा नदीलगत शहापूर तालुक्यातील भावसे, मोहिली, वावेघर, अघई, टहारपूर, नवेरे, वेलवहाळ, डिंबा व खैरे, भिवंडी तालुक्यातील बोरशेती, एकसाल, चिंचवली, कुंडे, रावडी, अकलोली, वज्रेश्वरी, महाळूंगे व गणेशपुरी आदी गांवांचा समावेश आहे. तर पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील निभावली, मेट, व गोरांड आणि वसई तालुक्यातील खानिवडे, घाटेघर, शिरवली, अदने, पारोल, अंबोडे, भटाणे, साईवान, काशीद कोरगाव, कोपरगाव, हेडावडे व चिमणे या गावपाड्यांचा समावेश आहे. यास अनुसरून प्रशासन सर्व प्रकारच्या सुरक्षित उपाययोजनांसाठी सज्ज असून जनतेने प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम परदेशी यांनी केले आहे.

Web Title: Thane: Thansa dam likely to fill; Villagers on the banks of the river are urged to be vigilant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.