Thane: ठाणे शहराच्या विविध भागात २५ ठिकाणी पाणपोई, महापालिकेने दिली सुविधा

By अजित मांडके | Published: May 8, 2024 04:42 PM2024-05-08T16:42:39+5:302024-05-08T16:43:10+5:30

Thane News: दिवसेंदिवस वाढत असलेल्या तीव्र उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेने आखलेल्या कृती आराखड्यानुसार कार्यवाहीस सुरूवात झाली आहे. त्यानुसार शहरातील १५० ठिकाणी पाणपोई सुरु करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

Thane: The Municipal Corporation has provided facilities for drinking water at 25 places in various parts of Thane city | Thane: ठाणे शहराच्या विविध भागात २५ ठिकाणी पाणपोई, महापालिकेने दिली सुविधा

Thane: ठाणे शहराच्या विविध भागात २५ ठिकाणी पाणपोई, महापालिकेने दिली सुविधा

- अजित मांडके 
ठाणे - दिवसेंदिवस वाढत असलेल्या तीव्र उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेने आखलेल्या कृती आराखड्यानुसार कार्यवाहीस सुरूवात झाली आहे. त्यानुसार शहरातील १५० ठिकाणी पाणपोई सुरु करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यानुसार आता शहरातील विविध ठिकाणी २५ जागांवर प्रत्येकी दोन रांजण ठेवण्यात आले आहे. तसेच त्याठिकाणी पाण्याची कमतरता भासणार नाही, या दृष्टीने महापालिकेने नियोजन आखले आहे.

 तीव्र उष्णतेमुळे होणा-या आजाराच्या प्रतिबंधासाठी ठाणे महानगरपालिकेने कार्यवाही सुरू केली आहे. नागरीकरणामुळे शहरात वाढत जाणाºया उष्णतेच्या धोक्याला नियंत्रण करण्यासाठी सर्वंकष उष्णता उपाययोजना आराखडा, महाराष्ट्र शासन, ठाणे महानगरपालिका व काऊन्सील आॅफ ऍनर्जी एनव्हायरोमेंट अ‍ॅण्ड वॉटर या संस्थेने एकत्रितपणे तयार केलेला आहे. उष्णतेच्या लाटेच्या सामना करण्यासाठी ठाणे महानगरपालिका सजग असून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जनजागृतीही करण्यात येत आहे. ठामपा क्षेत्रातील ३३ आरोग्य केंद्रे, ५ प्रसूतीगृहे, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे उष्माघात, त्याची लक्षणे, घ्यायची काळजी याची माहिती देणारी पत्रके लावण्यात आली आहेत. तसेच ठाणेकरांची तहान भागविण्यासाठी शहरातील महत्वाच्या ठिकाणी रांजण अर्थात पाणपोई ठेवण्यास सुरवात झाली आहे. १५० ठिकाणांपैकी पहिल्या टप्यात ३ ठिकाणीच पाणपोई ठेवण्यात आल्या होत्या. परंतु या पाणपोईसाठी आवश्यक असलेले रांजणच बाजारात उपलब्ध होत नसल्याने पुढील टप्यातील पाणपोई सुरु करण्यासाठी महापालिकेपुढे अडचणी निर्माण झाल्या होत्या.

आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निदेर्शानुसार महापालिका क्षेत्रात पाणपोई सुरू करण्यात आल्या आहेत. ठाणे महापालिकेने केलेल्या आवाहनानुसार, सीएसआरच्या माध्यमातून पाणपोई सुविधा उपलब्ध केली गेली आहे. या २५ ठिकाणी पाण्याचे मोठे माठ, ग्लास ठेवण्यात आले आहेत. तेथे दररोज पिण्याचे शुद्ध पाणी भरण्याची व्यवस्था संबंधित संस्था करत आहेत, माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी दिली.

ही आहेत पाणपोईची ठिकाणे
 ठाणे स्टेशन, कोपरी पूल, आईस फॅक्टरी, जवाहरबाग, आशर आयटी पार्क, किसननगर शाळा, अंबिका नगर नं. ३, पडवळ नगर, हाजुरी गाव, पासपोर्ट आॅफिस, तीन हात नाका, कोलशेत रोड नाका, बाळकूम नाका, माजीवडा नाका, कळवा स्टेशन, ९० फूट रस्ता-खारेगाव, कळवा नाका-दत्त मंदिर, कौसा तलाव, वफा पार्क, अमृत नगर, लोकमान्य डेपो, राबोडी, कोर्ट नाका, वर्तकनगर नाका, शास्त्री नगर नाका अशा २५ ठिकाणी पाणपोई सुरू करण्यात आली आहे.

Web Title: Thane: The Municipal Corporation has provided facilities for drinking water at 25 places in various parts of Thane city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.