... तर आडवा करुन आमची लोक पाडवा साजरा करतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा

By प्रज्ञा म्हात्रे | Published: April 9, 2024 02:09 PM2024-04-09T14:09:16+5:302024-04-09T14:10:18+5:30

Eknath Shinde News: हे राज्याला प्रगतीपथाकडे नेणारे सरकार आहे. या प्रगतीत जो कोणी आडवा येईल त्याला आडवा करुन आमची लोक पाडवा साजरा करतील असा टोला विरोधकांना मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.

Thane: ... then our people will celebrate Padwa in a different way, warns Chief Minister Eknath Shinde | ... तर आडवा करुन आमची लोक पाडवा साजरा करतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा

... तर आडवा करुन आमची लोक पाडवा साजरा करतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा

- प्रज्ञा म्हात्रे
ठाणे  - चंद्रपूरमध्ये कालच (सोमवारी) गुढी पाडवा साजरा झाला. पंतप्रधान मोदी यांच्या सभेला लोकांचा तुफान प्रतिसाद लाभला. सर्वत्र मोदीमय वातावरण होते. मोदी यांचे काम लोकांपर्यंत पोहोचत असून याच कामाची पोहोचपावती प्रत्येक सभेतून लोक देत आहेत. आमचे सरकार आल्यापासून सण - उत्सवांवरील बंधने काढली. आधीच्या सरकारने सण उत्सवावंर बंदी घातली होती. आज चौफेर विकास होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्याचे काम माझ्यासारखा कार्यकर्ता करत असल्याचे गौरवोद्गार काढले त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. हीच भूमिका घेऊन आम्ही राज्यात सरकार स्थापन केले आहे. सरकार बदलल्यामुळे मोकळा श्वास घेऊ लागले आहेत. हे राज्याला प्रगतीपथाकडे नेणारे सरकार आहे. या प्रगतीत जो कोणी आडवा येईल त्याला आडवा करुन आमची लोक पाडवा साजरा करतील असा टोला विरोधकांना मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.

Web Title: Thane: ... then our people will celebrate Padwa in a different way, warns Chief Minister Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.