Thane: ठाण्यात पोलिस खात्याचे अस्तित्वच नाही, जितेंद्र आव्हाडांची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 10:03 PM2023-04-04T22:03:47+5:302023-04-04T22:03:59+5:30
Thane: ठाण्यात पोलिस खात्याचे अस्तित्वच नाही, अशी टीका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. तर, पोलिस हे दबावाखाली काम करीत असल्याचा आरोप खासदार राजन विचारे यांनी केला.
ठाणे - ठाण्यात पोलिस खात्याचे अस्तित्वच नाही, अशी टीका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. तर, पोलिस हे दबावाखाली काम करीत असल्याचा आरोप खासदार राजन विचारे यांनी केला.
आ. आव्हाड यांनी ट्वीट करीत मुख्यमंत्री शिंदे आणि पोलिसांच्या कारभारावर टीका केली. या मारहाण प्रकरणात न्यायाची अपेक्षा सोडली. सरकार कसे चालवायचे हे मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून शिकावे. पोलिस सांगतात, वरून दबाव आहे. वरून म्हणजे? असे आव्हाड यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. खा. विचारे यांनी पोलिस यंत्रणा दबावाखाली काम करीत असून, मारहाण करण्याचा पोलिसांनी यांना परवाना दिला आहे का, असा प्रश्न विचारला आहे. रोशनीला काही झाल्यास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जबाबदार असल्याचे म्हटले आहे.
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्व. आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा घेऊन आम्ही चाललो आहे, असे शिंदे गटाचे कार्यकर्ते म्हणतात. महिलांवर हल्ले करण्याचे विचार साहेबांनी कधीच दिले नाही. आम्ही या घटनेचा निषेध व्यक्त करीत आहोत.
-केदार दिघे, ठाणे जिल्हाप्रमुख, उद्धव बाळासाहेब ठाकरे