कर्जमाफीसाठी ठाणे - पालघर जिल्ह्यातील ३२२५ शेतकऱ्यांना २८ कोटी ५८ लाख १३ हजार ९०२ रूपये भरण्याची सक्ती
By सुरेश लोखंडे | Published: December 21, 2017 03:25 PM2017-12-21T15:25:21+5:302017-12-21T15:33:56+5:30
कर्जमाफीच्या लाभासाठी दीड लाखांच्यावर थकबाकीची रक्कम असलेले ठाणे जिल्ह्यातील एक हजार ७३७ व पालघरमधील एक हजार ४८८ आदी तीन हजार २२५ शेतकरी देखील कर्जमाफीला पात्र ठरले आहेत. परंतु त्यांच्याकडील थकबाकी असलेली २८ कोटी ५६ लाखां १३ हजार ९०२ रूपये थकबाकी ३१ मार्च २०१८ पर्यंत त्यांना भरणे अपेक्षित आहे
ठाणे : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमाफी रकमेचा लाभ घेण्यासाठी दीड लाखांच्यावरची कर्जाची रक्कम प्रथम शेतकऱ्यांना भरणे सक्तीचे आहे. यानुसार ठाणे व पालघर जिल्ह्यातील ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (टीडीसीसी) थकबाकीदार असलेल्या तीन हजार २२५ शेतकऱ्यांना प्रथम सुमारे २८ कोटी ५८ लाख १३ हजार ९०२ रूपये भरणे अपेक्षित आहे. त्यानंतरच त्यांना संपूर्ण कर्जमाफी योजनेचा लाभ देणे शक्य होणार आहे.
नुकतीच ठाणे व पालघर जिल्ह्यातील २९ हजार ५५५ थकबाकी, कर्जदार शेतकऱ्यांच्या खात्यात ९५ कोटी ४० लाख ८५ हजार ६६० रूपयांची कर्जमाफी व प्रोत्साहनपर लाभ वर्ग करण्यात आला आहे. या प्रमाणेच कर्जमाफीच्या लाभासाठी दीड लाखांच्यावर थकबाकीची रक्कम असलेले ठाणे जिल्ह्यातील एक हजार ७३७ व पालघरमधील एक हजार ४८८ आदी तीन हजार २२५ शेतकरी देखील कर्जमाफीला पात्र ठरले आहेत. परंतु त्यांच्याकडील थकबाकी असलेली २८ कोटी ५६ लाखां १३ हजार ९०२ रूपये थकबाकी ३१ मार्च २०१८ पर्यंत त्यांना भरणे अपेक्षित आहे, तरच कर्जमाफीचा लाभ त्यांना त्वरीत देणे शक्य असल्याचे मत टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष भाऊ कु-हाडे व सीईओ भगिरथ भोईर यांनी सांगितले.
या दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दीड लाख रूपयांवरील थकबाकीची रक्कम भरल्यानंतर टीडीसीसी बँकेत देखील शासनाकडून त्वरीत ४८ कोटी ३७ लाखां रूपये जमा होणार आहे. यामुळे बँकेच्या गंगाजळीत मोठ्याप्रमाणात भर पडले. यासाठी बँकेचे अधिकारी, कर्मचारी देखील संबंधीत शेतकऱ्यांशी संपर्क साधून आहेत. दीड लाखांपेक्षा कमी कर्ज असलेल्या ठाणे जिल्ह्यातील १४ हजार ७३५ शेतकऱ्यांच्या खात्यात ४५ कोटी ७९ लाख २३२ रूपये वर्ग करण्यात आले आहेत. यांपैकी सात हजार ४९८ थकबाकीदार शेतकºयांना ३४ कोटी ४९ लाख ३१ हजार २८ रु पये तर सात हजार २३७ खातेदारांना ११ कोटी२९ लाख ६९ हजार २०४ कोटी प्रोत्साहनपर रकमेचा लाभ मिळाला आहे. पालघर जिल्ह्यातील १४ हजार ८२० खातेदार शेतकºयांच्या खात्यात ४९ कोटी ६१ लाखा ८५ हजार ४२९ रूपये वर्ग करण्यात आले आहेत. यातील नऊ हजार १५ थकबाकीदार खातेदारांना ३९ कोटी ९२ लाख एक हजार ९२६ रूपये कर्जमाफी तर पाच हजार ८०५ खातेदारांना नऊ कोटी ६९ लाख ८३ हजार ५०३ रूपये प्रोत्साहनपर रक्कम जमाझाली आहे. योजने अंतर्गत १ एप्रिल २००९ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत वाटप कर्जास कर्जमाफी मिळणार आहे.