ठाण्यात खासगी शिक्षकांचा हजारोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2018 05:22 PM2018-02-27T17:22:32+5:302018-02-27T17:22:32+5:30
महाराष्ट्र राज्य शासनाच्या शैक्षणिक विभागाने खासगी कोचिंग क्लासेसवर नियंत्रण आणण्याकरिता कच्चा मसुदा तयार केला आहे. या मसुद्यातील काही अटी, नियम हे क्लिष्ठ, जाचक, अन्यायकारक आहेत.
ठाणे- महाराष्ट्र राज्य शासनाच्या शैक्षणिक विभागाने खासगी कोचिंग क्लासेसवर नियंत्रण आणण्याकरिता कच्चा मसुदा तयार केला आहे. या मसुद्यातील काही अटी, नियम हे क्लिष्ठ, जाचक, अन्यायकारक आहेत. या अटीनुसार सर्वसामान्य क्लासेसची फीवाढ होणार आहे. ही सर्वसामान्य पालकांना फी परवडणार नाही. यांचा दुष्परिणाम महाराष्ट्रातील ५०००० पेक्षा जास्त सर्वसामान्य क्लासेसवर होणार आहे. यामुळे जवळ जवळ १० लाख शिक्षक व इतर
कर्मचारी बेरोजगार होणार असून, त्याच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे.
या संबंधी शैक्षणिक विभागाला वारंवार पत्र व्यवहार केला तरी सुद्धा शासनाने कोणत्याही प्रकारे दाद दिली नाही. या कारणास्तव शासनाचा निषेध करण्यासाठी आज ठाण्यात पालक, क्लासचे संचालक बहुसख्य आजि- माजी विद्याथी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर ५००० ते ६०००च्या संख्येने धडक मोर्चा काढण्यात आला. यामध्ये घरगुती शिकवणी घेनाऱ्या महिला शिक्षकांचा मोठा समावेश होता. महाराष्ट्रच्या इतिहासात पहिल्यांदाच ठाण्यात खाजगी क्लासेसचा असा हा भव्य धडक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
या मोर्चामध्ये शासनाचा निषेध करण्यासाठी मोर्चेकरांनी काळया रंगाच्या टोप्या, काळे झेडे, निषेध फलक दाखवून आपला निषेध व्यक्त केला. मोर्चा अत्यंत शांतीप्रिय, शिस्तीत व स्वच्छतेचे भान ठेवून निघाला. तसेच मा.सौ. वंदना सूर्यवंशी (उप जिल्हाधिकारी) यांच्याकडे शासनाने गठीत केलेली समिती बरखास्त करणे आणि इतर संघटनेच्या सर्व सामान्य क्लास संचालक यांना नवीन समितीमध्ये स्थान मिळण्याची मुख्य मागणी करण्यात आली.
तसेच निवेदनाच्या माध्यमातून मा. मा.सौ. वंदना सुर्यवंशी (उप जिल्हाधिकारी) आमच्या या मागण्यांचा पुन्हा योग्य विचार केला नाही तरभविष्यात या पेक्षा अधिक तिव्रतेने रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यात येईल. दुसरे आंदोलन हे महाराष्ट्रातील सर्व क्लासचे शिक्षक मिळून मंत्रालयावर धडकणार. यानंतर होणाऱया परिणामास शासन जबाबदार असेल असे ठणकावून सांगण्यात आले.
या मोर्चाचे नेतृत्व कोचिंग क्लासेस संघटनेने केले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सतिष देशमुख, कार्याध्यक्ष विनायक चव्हाण,उपकार्याध्यक्ष रविंद्र प्रजापती,ठाणे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, रायगड जिल्हाध्यक्ष अनिल काकुळते,
ठाणे शहर सचिव विनोद हादवे, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष सुदेश आरगोंडा,खजिनदार सुनिल सोनार, उपखजिनदार मिलिंद मोरे, मुलुंड भांडूप विभागाध्यक्ष सुखदेव जाधव, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष शरद बागवे, भरत जगताप, बबन चव्हाण, तावडे सर, सुभाष माळकर, मनोज यादव, राज सर,कदम सर, परेश कारंडे, भूषण सर, महिला शिक्षीका सौ. पुर्वा माने, सौ. अंजली आरगेंडा, सौ.सुरेखा पाटील, सौ. भारती देशमुख, सौ. रुपाली सरोदे, सौ. मिनाक्षी काकुळते, इत्यादी उपस्थित होते