ठाणे - शौचालयात येणा-या पुरूषांना शरीरसंबंधाचे अमिष दाखवून खंडणी उकळणा-या तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2017 09:58 PM2017-10-01T21:58:58+5:302017-10-01T21:59:56+5:30

शौचालयात येणा-या पुरुषांना मुलींशी शरीर संबंधाचे अमिष दाखवून त्यांच्याकडून खंडणी उकळणा-या इर्शाद शेख (२०), साकीर शेख (१९) आणि नदीम सय्यद (२१) या तिघांना डायघर पोलिसांनी अटक केली आहे.

Thane - Three men arrested in connection with ransom-related men | ठाणे - शौचालयात येणा-या पुरूषांना शरीरसंबंधाचे अमिष दाखवून खंडणी उकळणा-या तिघांना अटक

ठाणे - शौचालयात येणा-या पुरूषांना शरीरसंबंधाचे अमिष दाखवून खंडणी उकळणा-या तिघांना अटक

Next

ठाणे: शौचालयात येणा-या पुरुषांना मुलींशी शरीर संबंधाचे अमिष दाखवून त्यांच्याकडून खंडणी उकळणा-या इर्शाद शेख (20), साकीर शेख (19) आणि नदीम सय्यद (21) या तिघांना डायघर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

संबंधित 30 वर्षीय पिडीत पुरुष हा 20 सप्टेंबर रोजी ठाणे रेल्वे स्थानक येथील शौचालयात रात्री 8 वाजण्याच्या सुमारास गेला होता. तिथे इर्शादने त्याच्या मोबाईलवरुन एका मुलीचा फोटो त्याला दाखविला. शरीर संबंधासाठी त्याला आकृष्ट केले. त्याच हेतूने त्याला तो दिवा येथे घेऊन गेला. तिथे भोईर कंम्पाऊंडमधील कुरमुरा भट्टी परिसरातील एका इमारतीमध्ये त्याला नेण्यात आले. तेथे गेल्यावर मात्र इर्शादने त्याचे खरे रुप दाखविले. चाकूच्या धाकावर पिडीत व्यक्तिला त्याने अर्धनग्न केले. इथे कोणतीही मुलगी वगैरे नसून तुला माझ्याशीच शरीर संबंध ठेवावे लागतील, असे बजावले. त्याचवेळी तिथे साकीर आणि नदीमही तिथे आले. त्यांनीही अर्धनग्न असलेल्या या पिडीताला धमकी देत लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार करु, अशी धमकी देत त्याच्याकडून दहा हजारांच्या खंडणीची मागणी केली. त्याचवेळी त्यांनी हा प्रकार एका कॅमे-यातही कैद केला. त्याच जोरावर त्याला ते वारंवार खंडणीसाठी धमकावत होते. तिथून त्याने स्वत:ची कशीबशी सुटका करुन घेतली. याप्रकरणी डायघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपींच्या वर्णनावरुन वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुशिल जावळे, सहायक पोलीस निरीक्षक अब्दुल जावेद शाह यांनी वरील तिघांचीही धरपकड केली. 

पोलिसांचे आवाहन...
यातील पिडीताला ज्याप्रकारे शरीर संबंधाचे अमिष दाखवून त्याच्याकडून खंडणी उकळण्याचा प्रकार झाला. तशाच प्रकारे शहरातील आणखीही काही जणांची फसवणूक झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ज्यांची फसवणूक झाली असेल, त्यांनी डायघर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुशिल जावळे यांनी केले आहे.

Web Title: Thane - Three men arrested in connection with ransom-related men

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.