Thane: ठाण्यात बर्निंग कारचा थरार, वाहतूक पाउण तास ठप्प, नितीन उड्डाणपुलावरील घटना
By जितेंद्र कालेकर | Published: March 18, 2024 08:19 PM2024-03-18T20:19:07+5:302024-03-18T20:21:57+5:30
Thane News: मुंबई-नाशिक पूर्व द्रूत गती मागार्वरील नितीन कंपनी उड्डाणपूलावर एका माेटारकारला अचानक सोमवारी दुपारी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना निदर्शनास आली. या आगीत कारच्या आतील बाजूचे पूर्णतः नुकसान झाले आहे.
ठाणे - मुंबई-नाशिक पूर्व द्रूत गती मागार्वरील नितीन कंपनी उड्डाणपूलावर एका माेटारकारला अचानक सोमवारी दुपारी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना निदर्शनास आली. या आगीतकारच्या आतील बाजूचे पूर्णतः नुकसान झाले आहे. ही आग अर्ध्या तासात नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. आगीच्या घटनेने मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक सुमारे पाऊण तास ठप्प झाली होती.
दीपक गवळी हे मुंबईतील घाटकोपर येथून वाघबीळकडे डेकाेरेशन साहित्य घेउन ही कार घेऊन निघाले होते. नितीन कंपनी उड्डाणपूलावर आल्यावर अचानक कारने पेट घेतला. ही माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस कर्मचारी,आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. एका फायर वाहनासह, रेस्क्यू वाहन, वॉटर मिक्स फायर टेंडर वाहनाच्या मदतीने या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. कारमधून दीपक हे एकटेच प्रवास करीत होते. पेट घेतलेली कार रस्त्याच्या एका बाजूला गेल्यावर रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.