ठाणे वाहतूक शाखेने १३ दिवसांमध्ये केली एक कोटी ३० लाखांची दंड वसूली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 11:39 PM2020-12-14T23:39:33+5:302020-12-14T23:41:55+5:30
वाहतूकीचे नियम तोडल्यानंतर ई चलान दंडाची थकबाकी करणाऱ्या चालकांवर ठाणे शहर वाहतूक शाखेने कारवाई सुरु केली आहे. गेल्या १३ दिवसांमध्ये एक कोटी ३१ लाखांच्या दंडाची वसूली झाली आहे. वाहन जप्तीची कारवाई टाळण्यासाठी थकीत दंडाची रक्कम भरण्याचे आवाहनही पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांच्या विरोधात ई चलान पद्धतीने कारवाई होते. अनेक वाहनचालक दंडाची रक्कम भरण्याचे टाळतात. अशा चालकांवर ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून गेल्या काही दिवसांपासून धडक कारवाई सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या १३ दिवसांमध्ये एक कोटी ३१ लाखांच्या दंडाची वसूली झाली आहे. वाहन जप्तीची कारवाई टाळण्यासाठी थकीत दंडाची रक्कम भरण्याचे आवाहनही पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.
फेब्रुवारी २०१९ पासून ठाणे वाहतूक शाखा १८ उपविभागामार्फत ई चलान प्रक्रि या राबवित आहेत. फेब्रुवारी ते ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत नियम मोडणाºयांची सहा लाख ३० हजार २०४ प्रकरणे दाखल झाली. त्यांच्या दंडापोटी २१ कोटी १४ लाख रुपयांची थकबाकी होती. जानेवारी ते १३ डिसेंबर २०२० या कालावधीत चार लाख २३ हजार प्रकरणांमध्ये २५ कोटी ५ लाख रु पयांचा दंड ठोठावला आहे. कोरोना संक्र माणाच्या काळात दंड वसूलीचे प्रमाणही रोडावले आहे. वाहतूकीचा नियमांचे काटेकोर पालन व्हावे आणि त्यांचे उल्लंघन करणाºयांवर कायदेशीर कारवाईचे तसेच थकीत ई चलानच्या दंड वसुलीसाठी ठोस मोहिम राबविण्याचे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी उपायुक्त बाळासाहेब पाटील यांना दिले. याच पार्श्वभूमीवर १ डिसेंबरपासून ही मोहीम वाहतूक शाखेने सुरु केली. दररोज सरासरी दहा लाख रु पयांचा दंड वसूल केला जात आहे. या मोहिमेअंतर्गत होणारी कारवाई टाळण्यासाठी वाहनचालकांनी स्वत: थकीत दंडाची रक्कम भरून सहकार्य करावे असे आवाहन पाटील यांनी केले आहे.
*आपल्या वाहनांनी कुठे, कधी आणि कशा पद्धतीने वाहतूक नियमांचे उल्लंघन केले आहे याची सविस्तर माहिती ई चलानच्या पोर्टलवर उपलब्ध आहे. तिथेच दंडाची रक्कमही दिलेली आहे. ती भरण्यासाठी चार वेगवेगळे पर्याय उपलब्ध असून वाहनचालकांनी त्याचा अवलंब करावा असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.
*अशा पद्धतीने भरा ई चलानचा दंड
ठाणे शहर वाहतूक विभागाच्या अधिपत्याखाली ५९अधिकारी आणि अंमलदारांकडे ई चलान मशिन आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही चलानची रक्कम रोख किंवा क्र ेडिट आणि डेबिट कार्डच्या माध्यमातून तिथे भरता येणार आहे.