ठाणे वाहतूक नियंत्रण विभागाचा टोईंग व्हॅनचा कारभार कंत्राटाविना - मनसेचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 05:19 PM2017-11-29T17:19:31+5:302017-11-29T17:24:14+5:30
ठाणे शहरातील वाहनांवर ठाणे वाहतूक नियंत्रण विभागाकडून टोईंगद्वारे करण्यात येणाºया कारवाईवर मनसेने प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.
ठाणे : शहरातील वाहनांवर वाहतूक विभागाकडून केल्या जाणाऱ्या कारवाईचा गलथान कारभार असल्याचा आरोप करीत टोईंग व्हॅन बद्दलची ठाणे वाहतूक नियंत्रण विभागाकडे कोणतीही माहिती नाही असे मनसेने म्हटले आहे. तसेच, गेल्या सात वर्षांत वाहतूक विभाग आणि टोर्इंग करणाºया व्हॅन मालकांमध्ये कोणताही करार झाला नसल्याची माहिती प्राप्त झाल्याचे मनसेचे संदीप पाचंगे यांनी सांगितले.
टोर्इंग व्हॅन वर काम करणाºया कर्मचाºयांबाबत सततच्या होणाºया तक्र ारींपासून ठाणेकरांची सुटका व्हावी यासाठी वाहतूक विभागाच्या संपूर्ण प्रक्रियेबाबत मनसेचे पाचंगे यांनी माहिती मागविली होती. वाहतूक विभागाकडे टोर्इंग करणाºया कंत्राटदारासंदर्भात तसेच करारामध्ये वाहतूक शाखेने बंधनकारक केलेल्या अटी, शर्ती इत्यादी माहिती मिळणे अपेक्षित होते. वाहतूक विभाग आणि टोर्इंग करणाºया व्हॅन मालकांमध्ये कोणताही करार झाला नव्हता अशी धक्कादायक माहिती त्यांना माहितीच्या अधिकारात प्राप्त झाली असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या सात वर्षांत कोणतीही निविदा प्रक्रिया न राबविता फक्त २.५ कोटी रूपये शासनाकडे जमा झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित असलेल्या या विभागात किती पारदर्शी कारभार होतो हे या निमित्ताने उघडकीस आले आहे. तसेच, उपायुक्त अमित काळे यांना टोर्इंग संदर्भात प्रश्न विचारले असता ठाणे शहरात टोर्इंगच बंद करतो मग लोकांना त्रास झाला की कळेल असे उर्मट उत्तर मिळाल्याचा आरोप पाचंगे यांनी केला आहे. टोर्इंग सुविधा पुरविणे तुमचे कर्तव्य आहे आमचा विरोध टोर्इंगला नसून टोर्इंगच्या गलथान कारभाराला आहे असे उत्तर त्यांना दिल्याचे पाचंगे यांनी सांगितले. सात वर्षांत फक्त २.५ कोटी रूपये दंडापोटी शासनाकडे जमा झालेत म्हणजे नक्कीच महसूल बुडविला जात आहे, शासनाकडे जमा होणारा महसूल आणि ठाणेकरांकडून वसूल केला जाणारा दंड यात प्रचंड तफावत आहे, इतका कमी महसूल जमा होऊच शकत नाही असा गंभीर आरोप मनसेचे पाचंगे यांनी केला आहे. मनसे यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना वाहतूक विभागाच्या स्मार्ट कारभाराविषयी विचारणा करणार आहे. वाहतूक विभागाचे उपायुक्त काळे यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी कारभार स्वीकारल्यानंतर टोर्इंग व्हॅन मालकांशी करार करण्यास सुरवात केली आहे असे सांगितले असल्याचे पाचंगे यांनी सांगितले.
याबाबत उपायुक्त काळे यांच्याशी संपर्क केला असता अद्याप त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.