ठाणे वाहतूक पोलिसांनी एकाच रात्रीत केली ७७ मद्यपी चालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 10:08 PM2021-01-21T22:08:44+5:302021-01-21T22:11:59+5:30

मद्यपी वाहन चालकांविरुद्ध ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने विशेष मोहीम सुरु केली आहे. बुधवारी रात्री अशाच कारवाईमध्ये तब्बल ७७ मद्यपी वाहनचालक आणि ३५ सहप्रवाशांवर कारवाई करण्यात आली.रस्त्यांवर होणारे बहुसंख्य अपघात हे मद्यपी वाहन चालकांमुळे होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळेच गेल्या काही वर्षांपासून अशा वाहन चालकांच्या विरोधात पोलिसांकडून कारवाई केली जाते.

Thane traffic police cracked down on 77 drunk drivers in one night | ठाणे वाहतूक पोलिसांनी एकाच रात्रीत केली ७७ मद्यपी चालकांवर कारवाई

३५ सह प्रवाशांवरही कारवाईचा बडगा

Next
ठळक मुद्दे३५ सह प्रवाशांवरही कारवाईचा बडगामद्यपी चालकांविरुद्ध विशेष मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मद्यपी वाहन चालकांविरुद्ध ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने विशेष मोहीम सुरु केली आहे. बुधवारी रात्री अशाच कारवाईमध्ये तब्बल ७७ मद्यपी वाहनचालक आणि ३५ सहप्रवाशांवर कारवाई करण्यात आली. ही मोहीम यापुढेही सुरुच राहणार असल्याने मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, असे आवाहन ठाणे शहर वाहतूक शाखेने केले आहे.
रस्त्यांवर होणारे बहुसंख्य अपघात हे मद्यपी वाहन चालकांमुळे होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळेच गेल्या काही वर्षांपासून अशा वाहन चालकांच्या विरोधात पोलिसांकडून कारवाई केली जाते. रात्रीच्या वेळी ठिकठिकाणी नाकाबंदी करून पोलीस वाहन चालकांची श्वास विश्लेषक यंत्राद्वारे तपासणी करतात. मोटार वाहन कायद्याच्या कलम १८५ अन्वये मद्यपी वाहन चालक आणि कलम १८८ अन्वये सहप्रवाशांवरही कारवाई करण्याची तरतूद आहे. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून ठाणे पोलिसांकडून मद्यपी वाहन चालकांसह सहप्रवाशांवरही कारवाई केली जात आहे. बुधवारी रात्री वाहतूक शाखेच्या १८ विभागांतर्गत विविध ठिकाणी नाकाबंदी केली होती. त्यात ७७ मद्यपी वाहनचालकांना पोलिसांनी पकडले. त्यांच्यासोबतच्या ३५ सहप्रवाशांवरही कारवाई करण्यात आली. कापूरबावडी विभागाअंतर्गत सर्वाधिक १६ प्रवासी आणि आठ सहप्रवाशांवर कारवाई झाली आहे.
* ३१ डिसेंबरच्या रात्री पोलिसांनी पकडलेल्या एका मद्यपी वाहनचालकासह सहप्रवाशाला सात दिवस कारावासाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली होती. विशेष म्हणजे सहप्रवाशाने मद्य प्राशन केले नसतानाही त्यालाही तुरु ंगात जावे लागले होते. काही वाहनचालक आणि सहप्रवाशांना प्रत्येकी दहा हजार रु पये दंडाची शिक्षाही न्यायालयाने सुनावली आहे. रस्त्यांवरील अपघाताबरोबरच पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी मद्य प्राशन करुन कोणीही वाहन चालवू नये, असे आवाहन पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.

Web Title: Thane traffic police cracked down on 77 drunk drivers in one night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.