ठाणे वाहतूक पोलिसांची ३७५ मद्यपी वाहनचालक आणि १८१ सहप्रवाशांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 08:55 PM2020-12-30T20:55:43+5:302020-12-30T20:59:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्यांच्या विरोधातील ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांची कारवाई आता ...

Thane Traffic Police cracks down on 375 drunk drivers and 181 passengers | ठाणे वाहतूक पोलिसांची ३७५ मद्यपी वाहनचालक आणि १८१ सहप्रवाशांवर कारवाई

५५६ जणांकडून प्रत्येकी दोन हजार रुपये दंडाची वसूली

Next
ठळक मुद्दे थर्टी फस्टसाठीही कडेकोट बंदोबस्त ५५६ जणांकडून प्रत्येकी दोन हजार रुपये दंडाची वसूली

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्यांच्या विरोधातील ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांची कारवाई आता तीव्र झाली आहे. गेल्या पाच दिवसांमध्ये ३७५ मद्यपी वाहनचालकांसह त्यांच्यासोबत प्रवास करणाºया १८१ जणांवरही पोलिसांनी कारवाई केली. या ५५६ जणांकडून न्यायालयाच्या आदेशानुसार प्रत्येकी दोन हजार रु पये दंड वसूल केल्याची माहिती पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी मंगळवारी दिली.
कोरोना संक्र मणाचा धोका टाळण्यासाठी गेल्या आठ महिन्यांपासून वाहतूक पोलिसांकडून मद्यपी वाहनचालकांच्या विरोधात कारवाई केली जात नव्हती. मद्य प्राशन करून वाहन चालविल्यामुळे अपघातांची संख्या वाढण्याची भीती असल्याने २५ डिसेंबरपासून वाहतूक पोलिसांनी ही कारवाई पुन्हा सुरू केली. वाहन चालकांची सुरक्षित पद्धतीने तपासणीसाठी वाहतूक पोलिसांनी पीपीई किटसह विशेष कार्यपद्धती निश्चित केली. यामध्ये श्वास विश्लेषकाचे नोजलही प्रत्येक वेळी बदलण्यात येते. ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनचालकांची कसून तपासणी करण्यात येत आहे. गेल्या सहा दिवसांमध्ये ६०० पेक्षा जास्त मद्यपी चालकांवर कारवाई झाली. अशा मद्यपी चालकासोबत प्रवास करणे हा देखिल गुन्हा असून मंगळवारी रात्रीपासून अशा सहप्रवाशांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.
मंगळवारी रात्री ठाणे शहर, भिवंडी, कल्याण, मुंब्रा, कळवा, उल्हासनगर आदी ठिकाणी केलेल्या नाकाबंदी मोहिमेदरम्यान ८९ जण मद्य प्राशन करून वाहन चालवितांना आढळले. त्यांच्यासोबत प्रवास करणाºया ४३ जणांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही कारवाई यापुढेही अधिक तीव्र होणार असून कोणीही मद्य प्राशन करून वाहन चालवू नये किंवा मद्यपी वाहन चालकासोबत प्रवास करू नये, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
*कासरवडवलीमध्ये सर्वाधिक कारवाई
ठाणे आयुक्तालयातील वाहतूक शाखेच्या १८ युनिटपैकी कासरवडवलीच्या कार्यक्षेत्रामध्ये गेल्या पाच दिवसांमध्ये सर्वाधिक ५१ मद्यपी वाहनचालक आणि २८ सहप्रवासी आढळले. त्या खालोखाल वागळे इस्टेट, कापूरबावडी आणि भिवंडी या विभागांनी कारवाई केली. ठाणेनगरमध्ये सर्वात कमी म्हणजेच ९ मद्यपी वाहनचालक आणि तीन सहप्रवाशांवर कारवाई झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 

Web Title: Thane Traffic Police cracks down on 375 drunk drivers and 181 passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.