ठाणे रेल्वे तिकीट खिडकीवरील कर्मचाऱ्याची महिलेला शिवीगाळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 10:07 PM2021-06-08T22:07:27+5:302021-06-08T22:09:22+5:30
अत्यावश्यक सेवेत मोडत नसतांनाही रेल्वे प्रवासासाठी तिकीटाचा आग्रह धरणाºया ३२ वर्षीय महिलेला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणाºया अभय जोगदेव या रेल्वे कर्मचाºयाविरुद्ध ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: अत्यावश्यक सेवेत मोडत नसतांनाही रेल्वे प्रवासासाठी तिकीटाचा आग्रह धरणाºया ३२ वर्षीय महिलेला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणाºया अभय जोगदेव या रेल्वे कर्मचाºयाविरुद्ध ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या संपूर्ण गोंधळाचा व्हिडिओ देखिल व्हायरल झाल्यामुळे या कर्मचाºयाविरुद्ध संताप व्यक्त होत आहे.
ठाण्याच्या ज्ञानेश्वरनगर भागात राहणारी ही प्रवासी महिला मंगळवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास कामावर निघालेली निघाली होती. ती ठाणे रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक एकवर तिकीट खिडकी क्रमांक नऊवर रांगेत उभी होती. तिचा क्रमांक आल्यानंतर काउंटरवरील रेल्वे कर्मचारी जोगदेव याने तिच्याकडे ओळखपत्राची मागणी केली. तिने ते दाखविल्यानंतर त्याने तिकीट देण्यास नकार दिला. अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ रांगेत उभे राहूनही तिकीट न मिळाल्याने तिने संताप व्यक्त केला. त्यानंतर या रेल्वे कर्मचाºयाने तिच्या दिशेने पेन भिरकावला. त्यानंतर त्याने तिला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तिकीट न देताही शिवीगाळ केल्याने या महिलेने त्याला जाब विचारला.
यातून संतप्त जमावाने रेल्वे स्थानकात गोंधळ घातला. त्यानंतर अभय जोगदेव याच्या विरुद्ध रेल्वे पोलिसांनी कलम ५०४ आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार खडकीकर यांनी दिली. मुळात, लॉकडाऊनचे नियम काही प्रमाणात शिथिल झाले असले तरी अजूनही अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतर प्रवाशांना रेल्वे प्रवासाची मुभा नाही. त्यामुळे कोणीही विनाकारण रेल्वे प्रवासासाठी अत्यावश्यक कारणाव्यतिरिक्त आग्रह धरु नये, असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.