नवरात्रासाठी ठाण्यातील वाहतुकीत बदल

By admin | Published: October 13, 2015 01:49 AM2015-10-13T01:49:20+5:302015-10-13T01:49:20+5:30

नवरात्रोत्सवादरम्यान दुर्गादेवीचे दर्शन घेण्यासाठी शहरात टेंभीनाका येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. त्यामुळे या परिसरात वाहतूककोंडी होऊ नये व ती सुरळीत अन् सुरक्षित राहावी

Thane transport change for Navratri | नवरात्रासाठी ठाण्यातील वाहतुकीत बदल

नवरात्रासाठी ठाण्यातील वाहतुकीत बदल

Next

ठाणे : नवरात्रोत्सवादरम्यान दुर्गादेवीचे दर्शन घेण्यासाठी शहरात टेंभीनाका येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. त्यामुळे या परिसरात वाहतूककोंडी होऊ नये व ती सुरळीत अन् सुरक्षित राहावी, याकरिता १३ ते २१ आॅक्टोबर २०१५ या कालावधीत आम जनतेच्या सोयीसाठी सायंकाळी ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत ठाणे स्टेशन येथून सिव्हील हॉस्पिटलकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना (टी.एम.टी. व एस.टी. बसेससह) टॉवर नाका येथून प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्गे ही वाहने टॉवर नाका येथून डावीकडे वळून गडकरी सर्कल-दगडीशाळा चौक-अल्मेडा चौक मार्गे पुढे इच्छित स्थळी जातील. १३ आॅक्टोबर ते २१ आॅक्टोबर या कालावधीत सायंकाळी ५ वाजता ते रात्री १२ वाजेपर्यंत गडकरी सर्कलकडून टॉवर नाक्याकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना (टी.एम.टी. व एस.टी. बसेस) वसंत हॉटेल (गडकरी सर्कल) येथून प्रवेश बंद केला आहे. पर्यायी मार्गे ही सर्व वाहने व टीएमटी बसेस या गडकरी सर्कल-दगडीशाळा चौक मार्गे पुढे इच्छित स्थळी जातील.
या कालावधीत सायंकाळी ५ वाजता ते रात्री १२ वाजेपर्यंत चरईकडून एदलजी रोडने भवानी चौक टेंभीनाक्याकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना धोबीआळी क्र ॉस (मे. फेअर अपार्टमेंट) येथून प्रवेश बंद केला आहे. पर्यायी मार्गे सदरची सर्व वाहने ही धोबी क्र ॉस (मे. फेअर अपार्टमेंट) पर्यंत सरळ जाऊन डावीकडे वळून धोबीआळी चौक - धोबीआळी मशीद- सिव्हील हॉस्पिटल मार्गे पुढे इच्छित स्थळी जातील. या कालावधीत सायंकाळी ५ वाजता ते रात्री १२ वाजेपर्यंत कोर्टनाका बाजूकडून टेंभीनाका बाजूकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना कलेक्टर आॅफिस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून प्रवेश बंद करण्यात येत आहे. ही सर्व वाहने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून डावीकडे वळून सुभाष पथने जांभळी नाका-टॉवर नाका-मूस चौक-ठाणे रेल्वे स्टेशन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे इच्छित स्थळी जातील. दगडी शाळा बाजूकडून वीर सावरकर रोड मार्गे टेंभीनाक्याकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना दांडेकर ज्वेलर्स (यशोदीप क्लास) येथून प्रवेश बंद करण्यात येत आहे. ही वाहने दांडेकर ज्वेलर्स (यशोदीप क्लास) येथून डावीकडे वळून उत्तम मोरेश्वर मार्गे अहिल्यादेवी गार्डन धोबीआळी क्रॉस (मे. फेअर अपार्टमेंट) सरळ जाऊन धोबीआळी मशीद-सिव्हील हॉस्पिटल मार्गे इच्छित स्थळी जातील.
या कालावधीत मीनाताई ठाकरे चौकाकडून सिव्हील हॉस्पिटल कॉर्नर मार्गे टेंभीनाका व स्टेशनकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना सिव्हील हॉस्पिटल कॉर्नरकडून टेंभीनाक्याकडे जाण्याकरिता प्रवेश बंद केला आहे. ही वाहने सिव्हील हॉस्पिटल कॉर्नर-जीपीओ कोर्टनाका आंबेडकर पुतळा येथून डावीकडे वळून जांभळीनाका मार्गे इच्छित स्थळी जातील. तसेच धोबीआळी चौक, धोबीआळी क्रॉस अहिल्यादेवी गार्डन-उत्तम मोरेश्वर आंग्रे मार्गे प्रवेश बंद करण्यात येत असून सदरची वाहने धोबीआळी चौक, चरई एक्स्चेंज एदलजी रोड- एलबीएस रोड मार्गे पुढे इच्छित स्थळी जातील. या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहनांना दगडीशाळा, सेंट जॉन बॉप्टीस्ट हायस्कूल (जुना मुंबई-आग्रा रोड) दांडेकर ज्वेलर्स उत्तम मोरेश्वर आंग्रे मार्गे- अहिल्यादेवी गार्डन धोबीआळी क्र ॉस-धोबीआळी चौक- डॉ. सोनू मिया रोड ते सिव्हील हॉस्पिटल कॉर्नर यादरम्यान परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूस पार्किंग करण्यास मनाई केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Thane transport change for Navratri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.