मान्यवरांनी उलगडला ठाण्याचा प्रवास

By admin | Published: October 14, 2015 02:37 AM2015-10-14T02:37:14+5:302015-10-14T02:37:14+5:30

लोकमत काहीतरी कर ठाणेकर अंतर्गत ‘ठाणे काल आज आणि उद्या’ या परिसंवादाचे आयोजन शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता सहयोग मंदिर, घंटाळी येथे आयोजन केले होते.

Thane travels by the dignitaries to unfold | मान्यवरांनी उलगडला ठाण्याचा प्रवास

मान्यवरांनी उलगडला ठाण्याचा प्रवास

Next

ठाणे : लोकमत काहीतरी कर ठाणेकर अंतर्गत ‘ठाणे काल आज आणि उद्या’ या परिसंवादाचे आयोजन शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता सहयोग मंदिर, घंटाळी येथे आयोजन केले होते. यावेळी टीपटॉप प्लाझा चे संस्थापक रोहित शहा, ज्येष्ठ बांधकाम उद्योजक मुकुंद नातू, वास्तूतज्ज्ञ रविराज अहिरराव, सिनेदिग्दर्शक विजू माने, युवा पिढीचा लेखक सुदीप नगरकर आदी मान्यवर या परिसंवादाला उपस्थित होते.
विघ्नेश जोशी यांनी या मान्यवरांना त्यांच्या खुमासदार शैलीतून बोलते केले. जुन्या
ठाणे शहराचा बदलता चेहरा
या सर्वच मान्यवरांनी जवळून पाहिला आहे. त्यामुळे मनात कुठलीही
आढी न ठेवता ठाणे शहराविषयी सर्वच मान्यवर यावेळी भरभरून
बोलत होते.
ठाण्यामध्ये प्रथम जीन्स विकणाऱ्या रोहितभाई शहा यांनी ठाण्याला टीपटॉप बनविण्यासाठी पुढाकार घेतला. मॉन्जिनीस केक आणण्यासाठी ठाणेकरांना पूर्वी मुंबई गाठावी लागत असे हे लक्षात येताच त्यांनी ठाणे रेल्वे स्थानकाजवळ मॉन्जिनीस केकचे दुकान सुरू केले. तसेच ठाण्यातील नागरिकांना ताज्या माव्याची मिठाई खाता यावी यासाठी टिपटॉप मिठाईचे दुकान आणि त्यानंतर टिपटॉप प्लाझा हॉटेल सुरू केले. आतापर्यंत ३ ते ४ हजार ठाणेकर टीपटॉप प्लाझा येथील हॉलमध्ये लग्नबेडीत अडकल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. ठाण्यातील सर्व युवा पिढीला एकत्र करून व्यवसायाचे धडे देणे गरजेचे आहे. क्राफ्ट व्हिलेज तयार करण्याची माझी संकल्पना असल्याचे त्यांनी सांगितले. लोकमतने राबिवलेला काहीतरी कर ठाणेकर हा उपक्रम चांगला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
-रोहितभाई शहा (टिपटॉप प्लाझा)
ठाण्यामध्ये बाल्कनीची संकल्पना प्रथम मांडली आणि ठाणेकरांनी ती आपलीशी केली आणि त्याला भरभरून प्रतिसाद दिला. इमारत बांधतांना प्रकल्पामध्ये कुठलीही नवीन संकल्पना आणली तरीही ठाणेकर त्याला प्रतिसाद देतात. त्यामुळे ठाणेकरांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे त्यांच्या उद्योगाचा आलेख सतत चढता राहिला. प्रत्येक वसाहत परिपूर्ण देण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि यापुढेही करेन. तसेच लोकमतने राबविलेल्याल्या काहीतरी कर ठाणेकर यांच्या प्रत्येक उपक्रमात सहभागी होण्याचेही यावेळी त्यांनी कबूल केले.
- मुकूंद नातू (ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक)
ठाणे हे वास्तूशास्त्राच्या दृष्टीने अतिशय संपन्न असे शहर आहे या शहराला पूर्वीपासूनच तलाव समृद्धी लाभली आहे. या तलावात कारंजे असेल तर अधिक फायदेशीर असते. वास्तूच्या दृष्टीने भरभराट होते. त्यामुळे महापालिकेने तालवात कारंजे उभारण्याची सोय करावी असे त्यांनी सांगितले. सध्याचे युग हे बदलांचे युग आहे. त्यामुळे स्वत: पासून बदल करणे खुप गरजेचे आहे. स्मार्ट सिटीच व्हिजन खूप वेग घेत आहे. विकासाची सुरूवात आपल्यापासूनच व्हावी, तसेच सिंगापूर सारखे आॅटो डेबिट कार्ड टोल नाके बांधणे गरजेच आहे.
- रविराज अहिरराव (ज्येष्ठ वास्तूशास्त्रज्ञ)

Web Title: Thane travels by the dignitaries to unfold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.