वाऱ्यासह झालेल्या पावसात १३ ठिकाणी वृक्ष उन्मळले; अनेक वाहनांचे, घरांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 12:29 PM2021-05-17T12:29:02+5:302021-05-17T12:35:15+5:30
विविध ठिकाणी पडलेल्या वृक्ष उचलण्याचे काम ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत सुरू करण्यात आले आहे. या हानित चारचाकी वाहनांसह दुचाकीचे ही नुकसान झालेले आहे.
ठाणे: रात्रीपासूनच ठाणे शहरात वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. यामुळे शहरातील काही भागांचा खासकरून झोपडपट्टी भागातील वीजपुरवठा रात्रीपासून खंडित झाला आहे. तसेच ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शहाड येथील स्टेम प्राधिकरणाच्या जवळील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने शहराला कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. याशिवाय शहरातील विविध भागात १३ ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने अनेक वाहनांचे यात नुकसान झाल्याचे दिसून आले आहे.
वाऱ्यासह झालेल्या पावसात १३ ठिकाणी वृक्ष उन्मळले; अनेक वाहनांचे, घरांचे नुकसान pic.twitter.com/Lw7KJcqzn7
— Lokmat (@MiLOKMAT) May 17, 2021
विविध ठिकाणी पडलेल्या वृक्ष उचलण्याचे काम ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत सुरू करण्यात आले आहे. या हानित चारचाकी वाहनांसह दुचाकीचे ही नुकसान झालेले आहे. तसेच काही ठिकाणी घरांवर देखील वृक्ष पडल्याचे दिसत आहे. सुदैवाने या घटनांमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. तर १५ ठिकाणी वृक्षांच्या फांद्या पडल्याच्या घटना घडल्या आहेत. याशिवाय सहा ठिकाणी वृक्ष व धोकादायक स्थितीत असल्याचं दिसून आला आहे.
यासंदर्भात संबंधित रहिवाशांनी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. दुसरीकडे चक्रीवादळाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन ठाणे महापालिकेच्या वतीने आजचे लसीकरण बंद करण्यात आले आहे. रात्री पासून सूरु असलेल्या पावसाने सकाळ पर्यंत 6 मिमी पावसाची नोंद झाली आहे.