ठाण्यात महिलेच्या गळयातील सोनसाखळी खेचून दोघांचे पलायन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 21:19 IST2021-08-03T21:18:30+5:302021-08-03T21:19:27+5:30
महिलेच्या गळयातील सोनसाखळी खेचून दोन मोटारसायकलस्वारांनी पलायन केल्याची घटना रविवारी घडली. याप्रकरणी या महिलेने २ आॅगस्ट रोजी तक्रार दाखल केली.

नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
ठळक मुद्देनौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: महिलेच्या गळयातील सोनसाखळी खेचून दोन मोटारसायकलस्वारांनी पलायन केल्याची घटना रविवारी घडली. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नौपाडयातील हनुमानमंदिराच्या समोरील सेवा रस्त्यावरुन ही ६० वर्षीय विवाहिता १ आॅगस्ट रोजी रात्री १०.४५ वाजण्याच्या सुमारास जात होती. त्याचवेळी मोटारसायकलने आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्याने तिच्या गळयातील १५ ग्रॅम वजनाची ३० हजारांची सोनसाखळी जबरीने हिसकावून पलायन केले. याप्रकरणी या महिलेने २ आॅगस्ट रोजी तक्रार दाखल केली. सहायक पोलीस निरीक्षक मनिष पोटे हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.