Thane: भिवंडीच्या काल्हेर, आलीमघर खाडीतील कारवाईत अवैध वाळू उत्खनन करणारे दोन बार्ज व तीन पंप नष्ट
By सुरेश लोखंडे | Published: August 19, 2023 12:19 AM2023-08-19T00:19:17+5:302023-08-19T00:19:32+5:30
Thane: ठाणे जिल्हा महसूल यंत्रणेकडून भिवंडी तालुक्यातील काल्हेर आलीमघर खाडीत केलेल्या कारवाईत अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांवर धडाकेबाज कारवाई करण्यात आली. यावेळी दोन बार्ज, तीन संक्शन पंप असा एकूण ५० लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.
ठाणे - ठाणे जिल्हा महसूल यंत्रणेकडून भिवंडी तालुक्यातील काल्हेर आलीमघर खाडीत केलेल्या कारवाईत अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांवर धडाकेबाज कारवाई करण्यात आली. यावेळी दोन बार्ज, तीन संक्शन पंप असा एकूण ५० लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.
खाडीमधील अवैध रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये यांनी कडक कारवाई करण्याचे व गस्त घालण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार भिवंडीचे उपविभागीय अधिकारी अमित सानप, तहसिलदार (रेती गट) राहुल सारंग व भिवंडी तहसिलदार अधिक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाचे फिरते पथक व भिवंडी तहसील कार्यालय, भिवंडी मंडळ अधिकारी व भिवंडी व खारबाव तलाठी यांच्यामार्फत काल्हेर आलीमघर खाडीत कारवाई करण्यात आली. यामध्ये दोन बार्ज, तीन संक्शन पंप आढळून आले. हे बार्ज व संक्शन पंपचे वॉल काढलेले असल्याने ते किनारी भागात आणणे शक्य नसल्याने जागेवर जाळून खाडीमध्येच बुडवून नष्ट करण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये अंदाजे ५० लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.