Thane: उल्हासनगरात बालविवाह रोखला, नवऱ्यासह १० जणावर गुन्हा 

By सदानंद नाईक | Updated: February 26, 2025 00:19 IST2025-02-26T00:18:49+5:302025-02-26T00:19:14+5:30

Ulhasnagar News: चाईल्ड हेल्प लाईनवरील माहितीनुसार महिला बाळकल्याण विभाग व हिललाईन पोलिसांनी सोमवारी भाटिया चौकातील बालविवाह रोखण्यात यश आले. याप्रकरणी पोलिसांनी नवऱ्यासह १० जणावर गुन्हा दाखल केला असून अल्पवयीन वधुची चाईल्ड हॉम मध्ये रवानगी केली.

thane-ulahaasanagaraata-baalavaivaaha-raokhalaa-navarayaasaha-10-janaavara-gaunahaa | Thane: उल्हासनगरात बालविवाह रोखला, नवऱ्यासह १० जणावर गुन्हा 

Thane: उल्हासनगरात बालविवाह रोखला, नवऱ्यासह १० जणावर गुन्हा 

- सदानंद नाईक 
उल्हासनगर - चाईल्ड हेल्प लाईनवरील माहितीनुसार महिला बाळकल्याण विभाग व हिललाईन पोलिसांनी सोमवारी भाटिया चौकातील बालविवाह रोखण्यात यश आले. याप्रकरणी पोलिसांनी नवऱ्यासह १० जणावर गुन्हा दाखल केला असून अल्पवयीन वधुची चाईल्ड हॉम मध्ये रवानगी केली.

 उल्हासनगर कॅम्प नं-५, भाटिया चौक, ओटी सेकशन येथील एका हॉल मध्ये सोमवारी दुपारी बालविवाह होत असल्याची माहिती चाईल्ड हेल्प लाईनवरून एका अज्ञात व्यक्तीने दिले. त्यानुसार महिला व बालकल्याण विभाग अधिकारी व पोलिसांनी थेट लग्न मंडपात धडक देत नवरी मुलीच्या वयाचे कागदपत्रे तपासली. तेंव्हा नवरी १६ वर्ष ३ महिने असल्याचे उघड झाल्यावर अल्पवयीन नवरी मुलीला चाईल्ड होम मध्ये पाठविण्यात आले. तर नवरा याच्यासह त्याचे आई-वडील, नवरी मलीचे आई-वडील तसेच लग्न जोडणारे ५ मध्यस्थी असे १० जणावर हिललाईन पोलीस ठाण्यात बाल प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. असी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांनी दिली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: thane-ulahaasanagaraata-baalavaivaaha-raokhalaa-navarayaasaha-10-janaavara-gaunahaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.