ठाणे : अमेरिकन डॉलर चोरणारा जेरबंद; एक दिवसाची कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 01:34 AM2018-02-28T01:34:04+5:302018-02-28T01:34:04+5:30

तीन मोबाइलसह ५०० अमेरिकन डॉलर असा सुमारे ६६ हजारांचा ऐवज चोरणाºया हिमांशू घोसाळकर (१९, दोस्ती एमएमआरडी, ठाणे) याला सोमवारी वर्तकनगर पोलिसांनी अटक केली.

Thane: US Dollar Thief Jeriband; One day's closet | ठाणे : अमेरिकन डॉलर चोरणारा जेरबंद; एक दिवसाची कोठडी

ठाणे : अमेरिकन डॉलर चोरणारा जेरबंद; एक दिवसाची कोठडी

Next

ठाणे : तीन मोबाइलसह ५०० अमेरिकन डॉलर असा सुमारे ६६ हजारांचा ऐवज चोरणाºया हिमांशू घोसाळकर (१९, दोस्ती एमएमआरडी, ठाणे) याला सोमवारी वर्तकनगर पोलिसांनी अटक केली. त्याला एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने मंगळवारी दिले आहेत.
वर्तकनगरच्या ‘दोस्ती कॉम्पलेक्स’ या इमारतीच्या १६ व्या मजल्यावर राहणाºया नंदा रामा राव (५८) या २० फेब्रुवारीला मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास दुबई येथून ठाण्यातील घरी परतल्या. त्या घरी आल्यानंतर घराच्या बाहेर असलेल्या बूट स्टँडवर त्यांनी आपली पर्स ठेवून दरवाजा उघडला. याच पर्समध्ये १८ हजारांची रोकड, ५०० अमेरिकन डॉलर (३२ हजार ४०० रुपयांचे भारतीय चलन), तीन मोबाइल असा ६६ हजार ४०० रुपयांचा ऐवजही होता. घाईगडबडीत त्यांच्याकडून हा सर्व ऐवज असलेली पर्स घराबाहेरच राहिली. सकाळी ७ वाजता जाग आल्यानंतर त्यांनी फोन करण्यासाठी मोबाइलची शोधा शोध केली. तेंव्हा त्यांना त्यांचा एकही मोबाईल आणि पर्स मिळाली नाही. त्याचवेळी पर्स घराबाहेर विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. परंतु, घराबाहेरही शोधाशोध केल्यानंतरही त्यांना ती न मिळाल्याने त्यांनी अखेर याप्रकरणी २६ फेब्रुवारी रोजी दुपारी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्रेहल अडसुळे, हवालदार विनायक आंबेकर आणि कॉन्स्टेबल महेश राऊत यांच्या पथकाने नंदा यांच्या इमारतीमध्ये २० फेब्रुवारी रोजी पहाटे २ ते सकाळी ७ या दरम्यान कोण कोण आले? याची तपासणी केली. त्यावेळी पेपर विक्रेता हिमांशू यांच्यासह अन्य काही जण आल्याचे सीसीटीव्हीचे फुटेजही मिळाले. त्यात हिमांशूच्या हालचाली संशयास्पद आढळल्याने त्याची खास शैलीत या पथकाने चौकशी केली. याच चौकशीत त्याने या चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून तीन मोबाइल आणि एक कॅमेरा हस्तगत केला असून रोकड मात्र त्याने दिली नाही.

Web Title: Thane: US Dollar Thief Jeriband; One day's closet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.