ठाणेकर लसवंत! लसीकरणाचा टप्पा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात पूर्ण होणार; दुसरा डोस ६६ टक्के पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 04:47 PM2022-01-07T16:47:52+5:302022-01-07T16:48:09+5:30
लसीकरण मोहीमेला आलेली मरगळ आता काहीशी दुर झाली आहे. त्यानुसार आता ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील ९१ लसीकरण केंद्रावर रोजच्या रोज १४ ते १६ हजार लसीकरण होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : लसीकरण मोहीमेला आलेली मरगळ आता काहीशी दुर झाली आहे. त्यानुसार आता ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील ९१ लसीकरण केंद्रावर रोजच्या रोज १४ ते १६ हजार लसीकरण होत आहे. त्यानुसार आता येत्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात लसीकरणाचा पहिला डोस घेण्याचे उद्दीष्ट पूर्ण होईल असा दावा ठाणे महापालिकेचे उपायुक्त मनिष जोशी यांनी शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत केला आहे. तर दुसऱ्या डोसचे लक्ष देखील ६६ टक्के पूर्ण झाल्याचेही त्यांनी सांगितले.
ठाणे महापालिका हद्दीत जानेवारी २०२१ पासून लसीकरण मोहीमेला सुरवात झाली आहे. त्यानुसार महापालिकेला सुरवातीच्या टप्यात कमी अधिक प्रमाणात लसींचा साठा उपलब्ध होत होता. त्यामुळे तुरळक केंद्राच्या माध्यमातून लसीकरण मोहीम सुरु होती. त्यानंतर दुसरी लाट ओसरु लागली आणि लसीकरणाचा साठा देखील पुरेशा प्रमाणात पालिकेला उपलब्ध झाला. त्यामुळे पालिकेने लसीकरण केंद्राची संख्या वाढवत ५४ लसीकरण केंद्राच्या माध्यमातून लसीकरण सुरु ठेवले. त्यानंतर आता ही संख्या ७० ते ९१ र्पयत गेली आहे. शुक्रवारी महापालिका हद्दीत तब्बल ९१ लसीकरण केंद्रावर लसीकरण मोहीम सुरु असल्याचे दिसून आले. परंतु लसीकरणाला मधल्या काळात गती येत नसल्याची बाबही दिसून आली होती. त्यावर उपाय म्हणून ठाणो महापालिकेच्या माध्यमातून विविध स्वरुपाचे उपाय देखील करण्यात आले. त्यानुसार दोन डोस घेतलेल्यांना परिवहनच्या बसमध्ये प्रवासाची मुभा, कर्मचा:यांचा पगार कपात करण्याचा निर्णय, केसपेपर काढण्यापूर्वी लस घेतली की नाही? याची खातरजमा याशिवाय इतर उपाय योजना देखील पालिकेने हाती घेतल्या होत्या.
परंतु आता कोरोनाची तिसरी लाट सुरु झाल्याने लसीकरण मोहीमेलाही वेग वाढल्याचे दिसत आहे. मधल्या काळात ७ ते ८ हजारांच्या आसपासच रोजच्या रोज लसीकरण होतांना दिसत होते. आता मात्र लसीकरण केंद्रावरील गर्दी वाढली आहे. त्यामुळे आता १४ ते १६ हजार लसीकरण रोजच्या रोज होतांना दिसत आहे. त्यामुळे मागील काही दिवसापासून लसीकरण मोहीमेचा वेगही वाढला आहे.
त्यात आता महापालिकेने मागील काही दिवसापासून १५ ते १८ वयोगटातील मुलांचे देखील लसीकरण सुरु केले असून त्यांचे देखील आतार्पयत २३ हजार ३०३ मुलांचे लसीकरण झाले आहे.
१७ लांखाच्या लक्षाच्या जवळ
ठाणे महापालिकेने एकूण १७ लाख लोकसंख्येचे लक्ष लसीकरणासाठी ठेवले आहे. त्यानुसार आतार्पयत १४ लाख ४० हजार ७७३ जणांना म्हणजेच लक्षाच्या ८४ टक्के नागरीकांना पहिला डोस दिला आहे. तर दुसरा डोस १० लाख ९५ हजार ५८६ जणांना देण्यात आला आहे. त्यानुसार हे प्रमाण ६६ टक्के एवढे आहे.
लसीकरण तक्ता
लस - पहिला डोस - दुसरा डोस
हेल्थ वर्कर - २७८५७ - १८५९४
फ्रन्ट लाईन वर्कर - ३१५१२ - १८५८९
१८ वयोगटापुढील - ८३५१९२ - ६५७५४२
४५ ते ६० - ३१५१०६ - २५७६५७
६० वयोगटापुढील - २०७८०३ - १४३२०५
१५ ते १८ वयोगट -२३३०३ -००००