Thane: आव्हाडांविरोधात ठाण्यातील मनोरुग्णालयाबाहेर सकल हिंदू समाजाचे तीव्र आंदोलन

By अजित मांडके | Published: January 4, 2024 02:28 PM2024-01-04T14:28:20+5:302024-01-04T14:31:23+5:30

Thane: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. त्याचे पडसाद सर्वत्र उठत असतानाच, ठाण्यातील सकल हिंदू समाज या संघटनेच्या वतीने ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाबाहेर आमदार आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.

Thane: Violent protest by the entire Hindu community outside the psychiatric hospital in Thane | Thane: आव्हाडांविरोधात ठाण्यातील मनोरुग्णालयाबाहेर सकल हिंदू समाजाचे तीव्र आंदोलन

Thane: आव्हाडांविरोधात ठाण्यातील मनोरुग्णालयाबाहेर सकल हिंदू समाजाचे तीव्र आंदोलन

- अजित मांडके 
ठाणे - राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. त्याचे पडसाद सर्वत्र उठत असतानाच, ठाण्यातील सकल हिंदू समाज या संघटनेच्या वतीने ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाबाहेर आमदार आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. तसेच आव्हाड यांच्यासाठी मनोरुग्णालयात एक राखीव खाट आरक्षित ठेवावी. अशी मागणीही निवेदनाद्वारे त्या संघटनेने यावेळी केली. याचदरम्यान एका तरुणाच्या चेहऱ्याला आव्हाड यांचे फोटो लावत, गळ्यात फलक घालून रुग्णालयात नेण्यात आले. त्या फलकावर मी जितेंद्र आव्हाड वेडा आहे. मला अॕडमिट करा,असा उल्लेख पाहण्यास मिळाला.

ठाण्यातील सकल हिंदू समाजाचे विजय त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी, आंदोलनकर्त्यांनी वेडा झाला रे...वेडा झाला, जितेंद्र आव्हाड वेडा झाला अशा घोषणा दिल्या. तर विनाशकाले विपरीत बुद्धी या उक्तीप्रमाणे महाविकास आघाडीचे वेडपट नेते यांनी प्रभु श्री रामांसंदर्भात खोडसाळ विधान केले आहे. या वेडपट जितुद्दीनचे मानसिक संतुलन बिघडले आहे. म्हणून ठाणे मनोरुग्णालय आव्हाड यांना अॕडमिट करुन घेण्याची विनंती निवेदनाद्वारे मनोरुग्णालय वैद्यकीय अधीक्षकांकडे केली आहे.
तसेच एक राखीव खाट आरक्षित ठेवावी असेही त्या निवेदनात नमूद केले आहे. या आंदोलनात हाताच्या बोटावर मोजता येतील इतके आंदोलनकर्ते उपस्थित होते.

Web Title: Thane: Violent protest by the entire Hindu community outside the psychiatric hospital in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.