ठाणे, उल्हासनगरचे मतदार संभ्रमात
By admin | Published: February 16, 2017 02:05 AM2017-02-16T02:05:02+5:302017-02-16T02:05:02+5:30
ठाणे, उल्हासनगर महापालिकेची निवडणूक सहा दिवसांवर असतानाही एकाचवेळी चार मते कशी द्यायची, याबाबत मतदार संभ्रमात
ठाणे : ठाणे, उल्हासनगर महापालिकेची निवडणूक सहा दिवसांवर असतानाही एकाचवेळी चार मते कशी द्यायची, याबाबत मतदार संभ्रमात आहेत. तो दूर करण्याऐवजी राजकीय पक्ष दिशाभूल करत आहेत आणि प्रशासनानेही त्याबाबतची जागृती मोहीम हाती घेतलेली नाही.
त्यातच एक मत देण्यासाठी मतदाराची दीड ते दोन मिनिटे खर्च होणार आहेत. त्याला चार मते द्यावी लागमार आहेत. त्यामुळे मतदानकेंद्रातील मतदान दिलेल्या वेळेत पूर्ण करण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना मोठी कसरत करावी लागण्याची चिन्हे आहेत. चार मते दिल्याशिवाय मतदानप्रक्रि या पूर्ण होणार नाही. अ, ब, क, ड या जागांवरील उमेदवारांसाठी चार निरनिराळे रंग असतील. एखाद्या जागी कोणत्याही उमेदवाराला मत देण्याची इच्छा नसेल, तर तिथले ‘नोटा’ चे बटण दाबता येणार आहे, याबाबत पुरेशी जागृती झालेली नाही.
काही उमेदवारांनी आपल्याच पॅनेलमधील सहकाऱ्यांना पाडण्यासाठी क्र ॉस व्होटिंगचा पर्याय सांगण्यास सुरूवात केल्याने मतदारांचा गोंधळ उडतो आहे. दोन्ही महापालिकांनी या मतदान प्रकियेबाबत जनजागृती केली असली, तरी ती पुरेशी नसल्याचे दिसून येते आहे. (प्रतिनिधी)