Thane: कळव्यातील घरात वॉशिंग मशिनला आग, एक जखमी
By जितेंद्र कालेकर | Published: November 10, 2022 03:43 PM2022-11-10T15:43:33+5:302022-11-10T15:44:22+5:30
Thane News: कळवा येथील मनिषानगरातील एका घरात वाशिंग मशिन आणि विद्युत फलकाला आग लागल्याची घटना गुरुवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी विद्युत बटन बंद करतांना प्रतीक गायकवाड हे किरकोळ जखमी झाले.
- जितेंद्र कालेकर
ठाणे - कळवा येथील मनिषानगरातील एका घरात वाशिंग मशिन आणि विद्युत फलकाला आग लागल्याची घटना गुरुवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी विद्युत बटन बंद करतांना प्रतीक गायकवाड हे किरकोळ जखमी झाले. ठाणे अग्निशमन दलाच्या कर्मचाºयांसह टोरंट कंपनीच्या कर्मचाºयांनी अवघ्या अर्ध्या तासात ही आग आटोक्यात आणली.
ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार १० नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास कळव्यातील प्रतीक्षा अप्पार्टमेंट, बी विंगमध्ये चौथ्या मजल्यावरील रहिवाशी नितीन गायकवाड यांच्या सदनिकेतील वॉशिंग मशीनसह विद्युत फलकाला किरकोळ आग लागली होती. ही माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन कक्षासह टोरंटचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.
अवघ्या अर्धा ते पाऊणतासाच्या अंतराने ही आग आटोक्यात आणण्यात या पथकांना यश आले. घटनास्थळी घरातील विद्युत फलकावरील बटन बंद करीत असताना प्रतीक गायकवाड यांच्या डाव्या पायाला किरकोळ दुखापत झाली. त्यांना कळव्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.