ठाण्यातील कचरा ३५० मेट्रिक टनने घटला; वातावरणही झाले स्वच्छ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 01:38 AM2020-05-29T01:38:54+5:302020-05-29T01:39:07+5:30
ठाणे महापालिका हद्दीत दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे लॉकडाउनचा कालावधीही वाढविला आहे.
ठाणे : कोरोनास रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाउनमुळे वातावरणातही अनेक चांगले बदल होऊन प्रदूषणही कमी झाले आहे. ते होत असताना शहरात निर्माण होणाऱ्या कचºयातही मोठी घट झाली आहे. महापालिका हद्दीत लॉकडाउनआधी रोज ९६३ मेट्रिक टन कचरा निर्माण होत होता. परंतु, एप्रिल आणि मे या दोन महिन्यांच्या कालावधीत प्रतिदिन यात तब्बल ३५० मेट्रिक टन कचºयाची घट झाली आहे.
ठाणे महापालिका हद्दीत दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे लॉकडाउनचा कालावधीही वाढविला आहे. संपूर्ण शहरच आता रेड झोनमध्ये आले आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवांवरही त्याचा परिणाम झाला आहे. यामुळे शहरात वाहनांचा वेग मंदावल्याने त्याचा चांगला परिणाम वातावरणात झाला असून प्रदूषणही कमी झाल्याचे दिसून आले आहे. तलाव, खाडीतील प्रदूषणातही घट झाली आहे. शिवाय, शहरात रोज निर्माण होणाºया कचºयावरदेखील परिणाम झाल्याचे दिसून आले आहे.
शहरात लॉकडाउन लागू होण्यापूर्वी प्रतिदिन ९६३ मेट्रिक टन विविध कचºयाची निर्मिती होत होती. परंतु, लॉकडाउन लागू झाल्यापासून या कचºयामध्येही घट झाली आहे. शहरात आता प्रतिदिन ३५० मेट्रिक टन कमी कचरा तयार होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वाणिज्यिक कचरा झाला सर्वात कमी सोसायटी, झोपडपट्टी भागातून कचरा कमी झालेला नाही. परंतु, कमर्शिअल ठिकाणांवरील कचरा कमी झाल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.शहरात अनेक ठिकाणी बाजार बंद झाले आहेत. भाजी मार्केट बंद आहेत. व्यावसायिक दुकाने, हॉटेल आदी बंद असल्याने त्यांचा कचरा तयार होत नाही. त्यामुळे कचºयाच्या निर्मितीवरही परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. शिवाय, बांधकाम साइटसह कंपन्याही बंद होत्या. यामध्ये सर्व प्रकारच्या कचºयाचा समावेश आहे.