ठाण्यात हजामत महागणार!, जीएसटीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 02:10 AM2018-03-26T02:10:06+5:302018-03-26T02:10:06+5:30

वाढती महागाई आणि सौंदर्यप्रसाधनांवर लावण्यात आलेल्या जीएसटीसारख्या कारणांमुळे दाढी, कटिंगसह हजामतीचे दरही वाढवण्यात आले आहेत.

Thane will be hajaj!, GST blow | ठाण्यात हजामत महागणार!, जीएसटीचा फटका

ठाण्यात हजामत महागणार!, जीएसटीचा फटका

Next

जितेंद्र कालेकर 
ठाणे : वाढती महागाई आणि सौंदर्यप्रसाधनांवर लावण्यात आलेल्या जीएसटीसारख्या कारणांमुळे दाढी, कटिंगसह हजामतीचे दरही वाढवण्यात आले आहेत. या दरवाढीमुळे जनसामान्यांना नीटनेटके राहण्यासाठी आता अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागणार आहे.
जीएसटीच्या प्रभावामुळे केशकर्तनालयात लागणाऱ्या अनेक सौंदर्यप्रसाधनांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या. त्याचाच फटका सलून व्यावसायिकांना बसला. त्यामुळे जानेवारी २०१८ मध्येच दर वाढवण्याची मागणी ठाण्याच्या श्री संतसेना पुरोगामी नाभिक संघाच्या बैठकीत सलून व्यावसायिकांनी केली होती. त्याबाबतचा निर्णय फेब्रुवारीमध्ये घेण्यात आला. याच निर्णयाची अंमलबजावणी आता १ एप्रिल २०१८ पासून होणार असल्याची माहिती श्री संतसेना पुरोगामी नाभिक संघाचे ठाणे शहराध्यक्ष ज्ञानेश्वर राऊत आणि सचिव अरविंद माने यांनी दिली. नवीन दरानुसार केस कापण्यासाठी आता ६० ऐवजी ७० रुपये मोजावे लागणार आहेत. साध्या दाढीचा दर ४० वरून ५० रुपये करण्यात आला आहे. तर, स्पेशल दाढीचा दर ५०, ६० आणि ७० ऐवजी ६०, ७० आणि ८० रुपये केला आहे. जावळासाठीही आता २००, तर मुंज करण्यासाठी ३०० रुपये जादा मोजावे लागणार आहेत. हे दर तीन वर्षांनी वाढवले असले, तरी सलूनमध्ये येणाºया गिºहाइकांनी मात्र काहीशा निरुत्साहातच या दरापुढे मान झुकवली आहे. शहरातील दुकानांमध्ये हे दर आधी १ मार्चपासून लागू होणार, असे फलक लावले होते; परंतु गिºहाइकांच्या नाराजीनंतर ते आता १ एप्रिलपासून लागू केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जुने दर नवे दर
केस कापणे (६०) ७० रु.
साधी दाढी (४०) ५० रु.
दाढी कोरणे (४०) ६० रु.
स्टाइल केस (७०) ८० रु.
कानांवरील कट (४०) ५० रु.
बॉबकट (७०) ८० रु.
हेअर डाय (१५०) २०० रु.
जावळ (५५१) ७५१ रु.
मुंज (१२०० ) १५०० रु.

Web Title: Thane will be hajaj!, GST blow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.