ठाण्यात ज्येष्ठांनी लुटला नेचर ट्रेलचा आनंद, जाणून घेतली झाडांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 04:06 PM2018-06-30T16:06:51+5:302018-06-30T17:25:45+5:30
शनिवारी सायंकाळी लोढा लक्झोरिया सोयायटीतील ज्येष्ठ नागरिकांनी पावसाळी नेचर ट्रेलचा मनमुरादन आनंद लुटला.
ठाणे : पावसाळ्य़ात नेचर ट्रेलची मजा काही औरच असते. माजीवाडा येथील लोढा लक्झोरिया सोसायटीतील ज्येष्ठांनी पावसाळी नेचर ट्रेलचा आनंद लुटला. यावेळी त्यांनी बारा बंगला येथील दत्ता साळवी या उद्यानाला भेट देऊन तेथील स्थानिक झाडांची माहिती करुन घेतली.
केअर फॉर नेचर फाऊंडेशनतर्फे शनिवारी सायंकाळी पर्यावरणप्रेमी सचिन टेमकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा नेचर ट्रेल पार पडला. यावेळी त्यांनी दत्ता साळवी उद्यानातील स्थानिक झाडे व त्यांच्या प्रजातीची माहिती दिली. सुरूवातीला टेमकर यांनी हे उद्यान कसे उभारले याची सविस्तर माहिती देऊन या उद्यानातील वृक्षवल्ली पाहण्यासाठी मुंबईहून लोक येतात परंतू आपल्या शहरातच असलेल्या या उद्यानाकडे ठाणोकर मात्र फिरकत नसल्याची माहिती दिली. पळस बहावा, कंचन, अजरुन, चाफा, दुर्मिळ होत चाललेला कवटी चाफा, अंजीर, सुगंधीत फुलांची झाडे त्यात कामिनी, जाई, जुई, तसेच, मुख्यत: त्याठिकाणी असलेल्या बांबुच्या आठ प्रजाती याची माहिती दिली. ज्येष्ठांना त्या ठिकाणी बांबुचं तयार केलेल छोटंस वन पाहायला मिळाले. या उद्यानातील फुलझाडांवर फुलपाखरु, मधमाशा, पक्षी यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे हे उद्यान पक्षी निरीक्षण आणि झाडांच्या माहितीसाठी उत्तम असल्याचे टेमकर यांनी सांगितले. या उद्यानात दोन छोटे तळं तयार केले असून त्यात कमळ आल्याचे दाखविण्यात आले. स्थानिक झाडे ही आपल्या सोसायटीत लावली जात नाहीत. या झांडे महत्तव खूप आहे, पक्षी, किटक यांना या झाडांचा खुप उपयोग होतो. ही झाडे दुर्मिळ होत आहेत. रस्त्यांच्या दुतर्फा देखील ही झाडे लावली जात नाही. ही झाडे विविध प्रकारांचे पक्षी, फुलपाखरांसाठी वरदान आहे. स्थानिक झाडे ही दुर्मिळ होत आहे परंतू त्यांचे जतन आवश्यक आहे. ही झाडे या उद्यानात जोपासली गेल्याचे टेमकर यांनी ज्येष्ठांना सांगितले. शेवटी सहभागी ज्येष्ठांनी त्यांना प्रश्न विचारले. या उद्यानात आल्यावर आपण आपल्या शहरात आहोत असे वाटत नाही अशी प्रतिक्रिया ज्येष्ठांनी दिली. यात उल्हास कार्ले, किरण पाटील, संजय पाटील, प्रकाश कुलकर्णी, रविंद्र ओक, शंकरराव सावंत, सुजाता नवरे, अपर्णा कामत यांनी सहभाग घेतला होता. दर 15 दिवसांनी अशा प्रकारचा नेटर ट्रेल व्हावा अशी अपेक्षा कार्ले यांनी यावेळी व्यक्त केली.