ठाणे जिल्हा परिषदेचे आरोग्य, शिक्षण, बांधकाम खाते वगळता अन्य विभाग वागळे इस्टेटमधील भाड्याच्या इमारतीत!
By सुरेश लोखंडे | Published: February 17, 2024 07:59 PM2024-02-17T19:59:48+5:302024-02-17T20:00:07+5:30
या सर्व कार्यालयांच्या फायली, अन्य सामान गेल्या तीन दिवसांपासून शिफ्ट केले जात आहे.
ठाणे : येथील जिल्हा परिषदेची मुख्य इमारत जीर्ण झाल्यामुळे गेल्या काही वर्षांपूर्वी ती पाडण्यात आली. आता या जागी भव्य इमारत बांधण्याचे निश्चित झाले आहे. त्यासाठी या प्रांगणातील अन्यही तीन इमारती पाडव्या जागत आहे. त्यामुळे मुख्य इमारतीमधील अन्यत्र हलवलेले कार्यालये, या कॅम्पसमधील इमारतीतील कार्यालये आता वागळे इस्टेटच्या भाड्याच्या इमारतीत सोमवार, मंगळवारपासून सुरू होतील. या सर्व कार्यालयांच्या फायली, अन्य सामान गेल्या तीन दिवसांपासून शिफ्ट केले जात आहे. आरोग्य, शिक्षण आणि बांधकाम विभाग वगळता अन्य सर्व कार्यालये या इमारतीत सुरू होण्याचाा मार्ग मोकळा झाला आहे.
जिल्ह्यातील गांवपाड्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचे कामकाज जिल्हा परिषदेकडून केले जात आ हे. स्टेशनपासून जवळ असलेली ही मुख्य इमारत आता कात टाकणार आहे. त्या जागी भव्य इमारत उभी होत असल्यामुळे तेथील कार्यालयाच्या कामकाजासाठी कमीतकमी दोन वर्षाच्या कालावधीसाठी वागळे इस्टेट एमआयडीसीच्या राेड नं. १६वरील जुन्य कंमपनीची ईमारत भाड्याने घेतली आहे. या २५ हजार स्केअर फूट इमारतीची रंगरंगोटी करून अधिकाऱ्याचे दाखल व कार्यालयांची व्यवस्था पूर्ण झालाी आहे. त्यास अनुसरून या मुख्य इमारतीमधील सीईओ, अतिरिक्त साीईओ, यांच्या दाखलनासह , अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभातींचे दालन, लेखा विभाग, सामानय प्रशासन, ग्राम पंचायत विभाग आणि सभागृहाची व्यवस्था करण्यात आली.
जुन्या इमारतीमधील सध्याचे समाजकल्याण, महिला बालकल्याण विभागासह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कॅमपसमधील पशू संवर्धन, कृषी विभाग, लघू पाटबंधारे, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, स्वच्छता व पाणी पुरवठा आदी सर्व कार्यालयाचे वागळे इस्टेटला हलवण्ण्यात आली आहेत. उर्वरित शिक्षण विभाग प्राथमिक व माध्यमिक टेंभी नाका येथील बी. जे. हायस्कूलमध्ये हलवण्यात येत आहे. तर आरोग्य विभाग, बांधकाम विभाग आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ही कार्यालये आहे तेथेच राहणार असल्याचे बांधकाम विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.