ठाणे जिल्हा परिषदेकडून शहापूरच्या गांवखेड्यात महाश्रमदान; 'स्वच्छता ही सेवा' उपक्रमात लोकसहभाग
By सुरेश लोखंडे | Updated: October 1, 2023 18:04 IST2023-10-01T18:04:07+5:302023-10-01T18:04:39+5:30
शहापूरच्या ग्रामपंचायत शेणवे जिल्हास्तरीय महाश्रमदान उपक्रमाचा शुभारंभ आज करण्यात आला.

ठाणे जिल्हा परिषदेकडून शहापूरच्या गांवखेड्यात महाश्रमदान; 'स्वच्छता ही सेवा' उपक्रमात लोकसहभाग
सुरेश लोखंडे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: येथील जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडून रविवारी महाश्रमदान दिवसाच्या अनुशंघाने शहापूरच्या ग्रामपंचायत शेणवे जिल्हास्तरीय महाश्रमदान उपक्रमाचा शुभारंभ आज करण्यात आला.
जिल्ह्यातील गावखेड्यांमध्ये 'स्वच्छता ही सेवा' हा महाश्रमदानाचा उपक्रम ९५७ ठिकाणी आयोजित करण्यात आला. त्यापैकी जिल्हा स्तरीय कार्यक्रम शेणवा येथे पार पडला. यावेळी आमदार दौलत दरोडा, पाणी व स्वच्छताचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ, शहापूर गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अनिल निचिते, तालुका कार्यक्रम अधिकारी श्रीम रेखा बनसोडे, बाल विकास प्रकल्पअधिकारी डोळखांब सतीश पोळ, समाजसेवक मधुकर शिंदे, वसंत भेरे , सरपंच वसंत रण ग्रामसेवक शिक्षक विद्यार्थी अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ, कर्मचारी उपस्थित होते.
गावपरिसर, व बस स्टॉप परिसर प्राथमिक आरोग्य केंद्र परिसर स्वच्छ करण्यात आला, ग्रामपंचायती मार्फत हँड ग्लोज,मास्क,खराटे इ साहित्य उपलब्ध करून दिले...यावेळी मोठया प्रमाणात गावातील ग्रामस्थ, बचत गटातील महिला, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मधील निरूपणकार यांनी आज एक दिवस एक तास पूर्णवेळ स्वछता करुन गाव व परिसर स्वच्छ करण्यासाठी योगदान देऊन कार्यक्रम राबविण्यात आला