ठाणे जिल्हा परिषदेचे आता नवीन सीईओ कोण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 08:18 PM2019-02-09T20:18:32+5:302019-02-09T20:25:01+5:30
ठाणे : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विवेक भीमनवार यांची वर्धा जिल्हाधिकारी पदी अल्पावधीतच बदली झाली आहे. शुक्रवारी ...
ठाणे : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विवेक भीमनवार यांची वर्धा जिल्हाधिकारी पदी अल्पावधीतच बदली झाली आहे. शुक्रवारी त्यांच्या बदलीचे आदेश जारी झाले. मात्र त्यांच्या जागी अद्याप कोणाची वर्णी लागलेली नाही. तरी देखील ते विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार पात्र अधिकाऱ्याकडे सीईओ पदाचे सूत्रे सोमवारी देणार आहेत.
शुक्रवारी एका लग्न समारंभाच्या भेटी प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्याकडे चांगला सीईओ देण्याची मागणी केली असल्याचे खासदार कपील पाटील यांनी सांगितले. आयकर विभागाचा अनुभव असलेले भीमनवार यांनी समस्येच्या कालावधीतही जिल्हा परिषदेचे कामकाज ब-यापैकी संभाळण्यात यश मिळवल्याचे आमदार किसन कथोरे यांनी सांगून आगामी सीईओंचे नाव उघड करण्यास नकार दिला.पण या सीईओ पदाची जबाबदारी आता मंत्रालयातील अनुभवी महिला अधिका-यांवर देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यांचे आदेश जारी होईपर्यंत कदाचित ठाणेजिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेच्या जिल्हा प्रकल्प अधिकारी व सध्या अतिरिक्त सीईओंची जबाबदारी पार पाडत असलेल्या रूपाली सातपुते यांच्याकडे सीईओ पदाचे सूत्र जाण्याची चर्चा वरिष्ठ अधिकारी वर्गात ऐकायला मिळत आहे.