दिवाळीत मिळणार ठाणेकरांना मुबलक पाणी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 06:26 AM2017-10-18T06:26:15+5:302017-10-18T06:26:24+5:30

वीज पडून नुकसान झालेल्या पिसे केंद्रातील पाणीपुरवठा सुरळीत झाल्याने दिवाळीत कोणालाही पाणीटंचाई जाणवणार नसल्याचा दावा पालिकेने केला आहे.

 ThaneCars will get abundant water for Diwali |  दिवाळीत मिळणार ठाणेकरांना मुबलक पाणी  

 दिवाळीत मिळणार ठाणेकरांना मुबलक पाणी  

Next

ठाणे : वीज पडून नुकसान झालेल्या पिसे केंद्रातील पाणीपुरवठा सुरळीत झाल्याने दिवाळीत कोणालाही पाणीटंचाई जाणवणार नसल्याचा दावा पालिकेने केला आहे. तर तहानलेल्या भागातील नगरसेवकांनी अद्यापही पाणीटंचाई सुटली नसल्याचे म्हटले आहे.
घोडबंदरच्या वाढत्या गृहसुंकलांना पाणी देण्याच्या मुद्यावरुन उच्च न्यायालयाने ठाणे पालिकेवर ताशेरे ओढले होते. पण २०४० पर्यंत पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचे नियोजन असल्याचे आणि सध्याचा पाणीपुरवठा पुरेसा असल्याचे लेखी पत्र पालिकेने सादर केल्यानंतर न्यायालयाने बांधकामबंदी उठविली. नंतर महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाण्याच्या समस्येवरुन महापालिका प्रशासनाचे वाभाडे काढले होते. दिवाळीत तरी ठाणेकरांना पाणी मिळेल का? असा संतप्त सवाल नगरसेवकांनी केला होता. परंतु, आहे. त्यानुसार घोडबंदर भागाला ८० ऐवजी ८१ एमएलडी म्हणजेच एक एमएलडी अतिरिक्त पाणीपुरवठा, इंदिरानगर, वागळे येथे ५२ पैकी ५० एमएलडी पाणीपुरवठा आणि सिद्धेश्वरवरून २८ पैकी २८ एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. तर कळवा, मुंब्य्रातही तो सुरळीत करण्याचे प्रयत्न असल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाने केला आणि दिवाळीत पाणीटंचाई जाणवणार नसल्याचे स्पष्ट केले. तर आजही पाण्याची समस्या कायम असल्याचे मत राष्टÑवादीचे स्थानिक नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी मांडले.

वारंवार खंडित होणाºया वीजपुरवठ्यामुळे आणि पिसे येथे वीज पडल्याने पाणीपुरवठा सुरळीत होण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या.
पिसे येथील समस्या शुक्रवारी सुटल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाने केल्याने तो प्रश्नही निकाली निघाला.

Web Title:  ThaneCars will get abundant water for Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी