ठाणेकरांनी अनुभवली रश्मीन् भागवत यांची सुश्राव्य पियानो शैली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 04:18 PM2018-05-14T16:18:52+5:302018-05-14T17:41:49+5:30

मुळचे तबला वादक आणि पियानो वादक रश्मीन् भागवत यांचा संगीतप्रेमींसाठी पियानो धून कार्यक्रम सहयोग मंदिर येथे  पार पडला. 

Thanekar experienced Rishmee Bhagwat's well-known piano style | ठाणेकरांनी अनुभवली रश्मीन् भागवत यांची सुश्राव्य पियानो शैली

ठाणेकरांनी अनुभवली रश्मीन् भागवत यांची सुश्राव्य पियानो शैली

googlenewsNext
ठळक मुद्देठाणेकरांनी अनुभवली रश्मीन भागवत यांची सुश्राव्य पियानो शैलीपियानो शैलीत कीबोर्ड वादनाचा आस्वाद हिंदी मराठी अजरामर गाण्यांचा नजराणा पियानोवर ऐकण्याची संधी

ठाणे : सहयोग मंदिर सभाघृहात रश्मीन् भागवत यांच्या पियानो शैलीत कीबोर्ड वादनाचा आस्वाद ठाणेकरांना घ्यायला मिळाला. इतर पियानो वादकांपेक्षा आपण काहीतरी वेगळे करावे असे लक्ष्य ठेवून आपल्या रोलेंड कीबोर्डवर सदाबहार अजरामर अशा हिंदी-मराठी गाण्यांचा गजरा रश्मीन् यांनी आपल्या श्रोत्यांसाठी विणला होता

      हिंदी मराठी अजरामर गाण्यांचा नजराणा पियानोवर ऐकण्याची संधी ठाणेकरांना मिळाली. त्यात ओ.पी.नय्यरएस.डी.बर्मन, आर.डी.बर्मनमदन मोहनहृदयनाथ मंगेशकर.आर.रेहमानअजय-अतुल सारख्या दिग्गज संगीतकारांच्या रचना रश्मिन ने प्रस्तुत केल्यामेरा नाम चिन चिन चू,बाबूजी धीरे चलनाउषकाल होता होतागणेशाय धीमहीरंजिश ही सहीमेरे सपनो की रानी,कौन है जो सपनो मे,दम मारो दम सारखी एव्हरग्रीन पण एकट्या कीबोर्ड-वादकाने पियानो पद्धतीने वाजवण्यासाठी अतिशय अवघड अशी गाणी रश्मीन्ने सहजपणे हाताळली. प्रत्येक गाण्याची तालरचना बड्या सफाईने सांभाळून रश्मीन्ने सर्व गाण्यांना योग्य तो न्याय दिला४ बीट्सरॉक-एन्ड-रोलकेहरवादादरा भजनी ठेका आणि दीपचंदी” सारख्या अवघड तालरचना मूळ गाण्यासोबत तंतोतंत अचूकपणे वाजवून ताल आणि सुरावर आपले प्रभुत्व रश्मीन्ने दर्शवून प्रेक्षकांचे मन जिंकून घेतलेतीन तासाच्या ह्या आगळ्या कार्यक्रमाला हॉल तुडुंब गर्दी ने भरला होताव बसायला जागा नसतानाही रसिक प्रेक्षक दाटीवाटीने उभे राहून शेवटपर्यंत कार्यक्रमाचा आस्वाद घेत होतेमंत्रमुग्ध रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट करत ब–याच गाण्यांना वन्स-मोरची फर्माईश सुद्धा दिलीनरेंद्र बेडेकर ह्यांनी खूप सुंदर निवेदन करत रश्मिन शी संवाद साधून त्यांचा प्रवास व वादन-शैलीतील बारकावे ह्याबद्दल माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवून कार्यक्रमाला एक वेगळाच रंग दिला ज्यामुळे रसिकांना एक वेगळाच आनंद मिळाला. अश्याच प्रकारची प्रस्तुती येत्या काळात आपण करणार असे आश्वासन ही रश्मीन्ने रसिक श्रोत्यांना दिले.

Web Title: Thanekar experienced Rishmee Bhagwat's well-known piano style

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.