कायद्याचा दंडुका न उगारताही ठाणेकरांनी चांगली साथ दिली
By जितेंद्र कालेकर | Published: May 6, 2021 12:19 AM2021-05-06T00:19:43+5:302021-05-06T00:23:05+5:30
फणसळकर यांना राज्य राज्याच्या पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळामध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून (पोलीस महासंचालक) मंगळवारी बढती मिळाली. त्यानंतर आपल्या ठाण्यातील कार्यकाळाबद्दल बोलतांना ते म्हणाले, कोणत्याही अधिकाºयाला किंवा कर्मचाºयाला वेळेत पदोन्नती झाली की, त्याचे वेगळेच समाधान असते. ते आपल्यालाही ठाण्यातून जातांना मिळाले.
जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्र हे वैविध्यपूर्ण आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या वेळी लॉकडाऊन केले. त्यानंतर केवळ आवाहन करताच ठाणेकरांनी चांगली साथ दिली. कुठेही कायद्याचा दंडूका उगारण्याची वेळ आली नाही. आपल्या कार्यकाळात कायदा सुव्यवस्था चांगल्या तºहेने हाताळता आली, याचे समाधान असल्याच्या भावना ठाण्याचे मावळते पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी बुधवारी ‘लोकमत’शी बातचीत करतांना व्यक्त केल्या.
फणसळकर यांना राज्य राज्याच्या पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळामध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून (पोलीस महासंचालक) मंगळवारी बढती मिळाली. त्यानंतर आपल्या ठाण्यातील कार्यकाळाबद्दल बोलतांना ते म्हणाले, कोणत्याही अधिकाºयाला किंवा कर्मचाºयाला वेळेत पदोन्नती झाली की, त्याचे वेगळेच समाधान असते. ते आपल्यालाही ठाण्यातून जातांना मिळाले. त्यामुळे ठाणेकर, ठाण्यासह कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर येथील नागरिक आणि लोकप्रतिनिधीं, पोलीस अधिकारी कर्मचारी या सर्वांच्याच सहकार्यामुळे ही बढती मिळाल्याचे ते म्हणाले. कोरोना काळात ठाणे पोलिसांनी जी कौतुकास्पद कामगिरी केली. याची दखल राज्य शासनानेही घेतली. यात दोन हजारांपेक्षा अधिक अधिकारी कर्मचारी बाधित झाले. तर ३५ पोलीस शहीद झाले, याचे शल्य असल्याचेही ते म्हणाले.
३१ जुलै २०१८ पासून ते आतापर्यंत पावणे तीन वर्षांच्या कालावधीत ठाणे शहर पोलिसांनी लोकसभा तसेच विधानसभा सार्वत्रिक निवडणूक, गणेशोत्सव, रमजान आणि नवरात्र या सारखे सण उत्सव कोणतेही गालबोट न लागता पार पाडले. गुन्हेगारीवर नियंत्रण तसेच दोष सिद्धीमध्येही चांगली वाढ झाल्याबद्दलही त्यांनी व्यक्त केले.
* कोरोनाकाळात तर नागरिकांच्या आणि पोलिसांच्या अडचणी स्वत:च्या समजून काम केले. त्यामुळे नागरिकांप्रमाणे अनेक पोलिसांचे त्यांच्या कुटूंबीयांचे प्राण वाचविता आले. कोरोनामुळे दुर्देवाने शहीद झालेल्या पाल्यांच्या मुलांनाही तात्काळ पोलीस सेवेत घेण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला.
* हे काम अपुरेच राहिले....
भिवंडीतील उपायुक्तांचे कार्यालय आणि निजामपुरा पोलीस ठाण्याचे काम गेली १२ वर्षे रखडले होते. याच बांधकामावरुन दंगल झाल्याने यात दोन पोलीस कर्मचारी शहीद झाले होते. २०१८ पासून सुरु झालेले हे काम येत्या दोन महिन्यात पूर्ण होईल. आपल्याच कार्यकाळात हे पूर्ण करण्याचा मानस होता. पण ते पूर्ण करायचे राहून गेले. वर्तकनगर पोलीस वसाहतींचा पुनर्विकासही काही कारणास्तव रखडला.
* कोरोना काळात सकारात्मक उर्जा, चेतना कायम ठेवून टीम वर्कने काम केले. यात ठाणेकरांनी चांगली साथ दिली. तब्बल ९० लाखांची लोकसंख्या असलेल्या पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात आपल्या कार्यकाळात कायदा सुव्यवस्था शांततेत पार पडली, याचेही समाधान असल्याचे ते फणसळकर म्हणाले.