ठाणेकर मधुरिका पाटकर अर्जुन पुरस्काराने सन्मानित, राष्ट्रीय क्रीडादिनी मंत्रालयात झाला गौरव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 01:57 AM2020-08-30T01:57:28+5:302020-08-30T01:58:49+5:30

मधुरिकाच्या निमित्ताने गेल्या ६० वर्षांत ठाण्याला टेबल टेनिसमध्ये तरी पहिल्यांदाच हा मानाचा पुरस्कार मिळाल्याने ठाणेकरांसाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे.

Thanekar Madhurika Patkar honored with Arjuna Award, honored at Mantralaya on National Sports Day | ठाणेकर मधुरिका पाटकर अर्जुन पुरस्काराने सन्मानित, राष्ट्रीय क्रीडादिनी मंत्रालयात झाला गौरव

ठाणेकर मधुरिका पाटकर अर्जुन पुरस्काराने सन्मानित, राष्ट्रीय क्रीडादिनी मंत्रालयात झाला गौरव

Next

ठाणे : आतापर्यंत जिल्हा, राज्य, राष्टÑीय आणि आंतरराष्ट्रीय पातळ्यांवर शेकडो पदके मिळवणारी ठाणेकर मराठमोळी टेबल टेनिसपटू मधुरिका पाटकर हिला यंदाचा अर्जुन पुरस्कार मिळालेला असून यंदा पहिल्यांदाच कोरोनामुळे हा पुरस्कार सोहळा आॅनलाइन पार पडला. मात्र, मधुरिकाच्या निमित्ताने गेल्या ६० वर्षांत ठाण्याला टेबल टेनिसमध्ये तरी पहिल्यांदाच हा मानाचा पुरस्कार मिळाल्याने ठाणेकरांसाठी ही अभिमानाची बाब
ठरली आहे.

राष्टÑीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून शनिवारी हा पुरस्कार सोहळा मंत्रालयातील सभागृहात पार पडला. यंदा पहिल्यांदाच या सोहळ्याचे आयोजन राष्टÑपती भवनात न होता आॅनलाइन झाले होते. २६ जणांना अर्जुन पुरस्कार मिळाला असून यात ठाणेकर मधुरिकाचा समावेश आहे.
मधुरिका वयाच्या सातव्या वर्षापासून टेबल टेनिस खेळत असून तिने शेकडो पदके मिळवली आहे. कॉमनवेल्थ, साउथ एशियन गेम्स, एशियन गेम्स, महाराष्टÑ स्टेट कॉम्पिटिशन अशा अनेक स्पर्धांमध्ये सुवर्णपदकांसह विविध पदके तिने पटकावली आहेत.

‘आॅलिम्पिक खेळण्याचे स्वप्न’

अर्जुन पुरस्कार मिळाल्याचा मला अतिशय आनंद आहे. याचे सारे श्रेय माझे आईवडील, पती, माझ्या प्रशिक्षक शैलजा गोहाड, माझे कुटुंबीय, विविध मार्गदर्शक, माझी कंपनी आणि विविध क्रीडा असोसिएशन्स, भारताच्या टीममधील माझे सर्व सहकारी यांचे आहे, असे मधुरिकाने सांगितले. पण, या पुरस्काराने माझी जबाबदारीसुद्धा वाढली आहे.

क्रीडा क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या सर्व युवा खेळाडूंना प्रेरणा मिळावी, असा खेळ मला यापुढे करावा लागणार आहे आणि मी सर्वोत्कृष्ट खेळ करून दाखवेन, असे ती म्हणाली. तर, आॅलिम्पिक खेळणे, हे तिचे स्वप्न आहे. या पुरस्कार सोहळ्याला तिच्यासोबत तिचे वडील सुहास पाटकर आणि पती ओमकार तोरगळकर उपस्थित होते.

Web Title: Thanekar Madhurika Patkar honored with Arjuna Award, honored at Mantralaya on National Sports Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.