पं.राम मराठे संगीत महोत्सवात सादर झालेल्या शास्त्रीय गायनाने ठाणेकर रसिक मंत्रमुग्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2019 04:09 PM2019-12-08T16:09:50+5:302019-12-08T16:12:22+5:30

पं.राजेंद्र गंगाणी यांच्या कथ्थक नृत्याला रसिकांची उस्फुर्त दाद मिळाली. 

Thanekar Rasik enchanted with classical singing performed at Pandit Ram Marathe Music Festival | पं.राम मराठे संगीत महोत्सवात सादर झालेल्या शास्त्रीय गायनाने ठाणेकर रसिक मंत्रमुग्ध

पं.राम मराठे संगीत महोत्सवात सादर झालेल्या शास्त्रीय गायनाने ठाणेकर रसिक मंत्रमुग्ध

Next
ठळक मुद्देशास्त्रीय गायनाने ठाणेकर रसिक मंत्रमुग्धपं.राम मराठे संगीत महोत्सव पं.राजेंद्र गंगाणी यांच्या कथ्थक नृत्याला रसिकांची उस्फुर्त दाद

ठाणे: ठाणेकर रसिकांसाठी संगीताची पर्वणी असलेल्या पं.राम मराठे संगीत समारोहाच्या दुसऱ्या दिवशी दीपा पराडकर- साठे, यशश्री कडलासकर आणि रमाकांत गायकवाड यांनी सादर केलेल्या शास्त्रीय गायनाने ठाणेकर रसिक मंत्रमुग्ध झाले. या दिवसाच्या शेवटच्या सत्रात पं.राजेंद्र गंगाणी यांनी सादर केलेल्या कथ्थक नृत्याला ठाणेकर रसिकांनी  उस्फुर्त दाद दिली.

     संगीत समारोहाच्या आजच्या पहिल्या सत्रात 25 वर्षाहून अधिक काळ शास्त्रीय व उप शास्त्रीय संगीताचा प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या दीपा पराडकर- साठे यांनी शास्त्रीय संगीतातील विविध राग सादर केले. त्यांनी सादर केलेल्या राग ' धानी' ला रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला. ठाण्याच्या युवा कथ्थक नृत्यागंणा श्रद्धा शिंदे यांनी बहारदार कथ्थक नृत्याचे सादरीकरण केले. गत, तोडे, तत्कार, घुंगुरांचा लयबद्ध आवाज, तालवादकासह नृत्याची  जुगलबंदीने त्यांनी रसिकांची मने जिंकली. यावेळी पुण्याच्या प्रसिध्द शास्त्रीय गायिका यशश्री कडलासकर यांनी यमन राग व भजन सादर करून या महोत्सवाची रंगत वाढविली तर युवा शास्त्रीय गायक रमाकांत गायकवाड यांनी  त्यांच्या गायनाने अधिक रंगत  वाढविली. रागेश्री या रागाने त्यांनी आपल्या गायनाला सुरुवात केली.त्यानंतर सय्य़ा फिर याद आये आणि का करु सजनी आये ना बालम ही ठुमरी सादर केली. परंपरेची आणि जयपूर घराण्याची शुध्दता राखून अनेक प्रयोग करणारे पं.राजेंद्र गंगाणी यांनी सादर केलेल्या कथक नृत्य़ला ठाणेकर रसिकांनी चांगलीच दाद दिली. पं.राजेंद्र गंगाणी यांच्या कथक नृत्य़ातील गती आणि ठहराव यांच्या विशेष शैलीतील सादरीकरणाद्वारे थेट प्रेक्षकांशी संवाद साधला गेला. आजच्या य़ा सांगीतिक कार्यक्रमास स्थायी समिती सभापती राम रेपाळे, माजी उप महापौर तथा नगरसेवक रमाकांत मढवी, शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, उप आयुक्त संदीप माळवी, सहाय्यक आयुक्त महादेव जगताप यांच्यासह ठाणेकर रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Thanekar Rasik enchanted with classical singing performed at Pandit Ram Marathe Music Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.