बंदमुळे ठाणेकर राहिले उपाशी! ५०० हॉटेल व्यावसायिकांचा कारवाईविरुद्ध एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 06:56 AM2018-03-07T06:56:56+5:302018-03-07T06:56:56+5:30

महापालिकेने नोटीस देऊनही त्यावर कोणतीही कार्यवाही न करणाºया ८६ हॉटेल व बारपैकी १३ हॉटेल व बार सील करण्याची कारवाई अग्निशमन विभागाने केली आहे. यानंतर, अग्निशमन विभागाच्या जाचक अटी आणि त्रासाला कंटाळून मंगळवारी ठाणे शहरातील तब्बल ५०० हॉटेल व्यावसायिकांनी दुपारी ४ वाजल्यापासून एक दिवसाचा बंद पुकारला.

 Thanekar remained hungry due to the shutdown! Elgar against 500 hotel professionals | बंदमुळे ठाणेकर राहिले उपाशी! ५०० हॉटेल व्यावसायिकांचा कारवाईविरुद्ध एल्गार

बंदमुळे ठाणेकर राहिले उपाशी! ५०० हॉटेल व्यावसायिकांचा कारवाईविरुद्ध एल्गार

Next

ठाणे - महापालिकेने नोटीस देऊनही त्यावर कोणतीही कार्यवाही न करणाºया ८६ हॉटेल व बारपैकी १३ हॉटेल व बार सील करण्याची कारवाई अग्निशमन विभागाने केली आहे. यानंतर, अग्निशमन विभागाच्या जाचक अटी आणि त्रासाला कंटाळून मंगळवारी ठाणे शहरातील तब्बल ५०० हॉटेल व्यावसायिकांनी दुपारी ४ वाजल्यापासून एक दिवसाचा बंद पुकारला. यामुळे हॉटेलवर पोटभरणाºया ठाणेकरांचे अतोनात हाल झाले. आयुक्तांशी बुधवारी चर्चा केल्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्याचा निर्णयदेखील त्यांनी घेतला आहे.
अग्निशमन दलाचा ना-हरकत दाखला नसलेल्या ठाणे शहरातील एकूण ४२६ हॉटेल, बार, लाउंज यांना यापूर्वी अग्निशमन दलाच्या वतीने नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यापैकी जवळपास ८० आस्थापनांनी आवश्यक ती कागदपत्रे सादर केल्याने ती हॉटेल नियमित करण्यात आली आहेत. तसेच २६० प्रकरणे शहर विकास विभागाकडे नियमित करण्याच्या कार्यवाहीसाठी सादर करण्यात आली आहेत. परंतु, नोटीस दिल्यानंतरही त्यावर काहीही कार्यवाही न केलेले एकूण ८६ हॉटेल, बार, लाउंज तीन दिवसांत सील करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी दिले होते. त्यानंतर, शनिवारी अग्निशमन विभागाने शहरातील तब्बल १३ हॉटेल सील केले होते. टप्प्याटप्प्याने उर्वरित हॉटेलही सील केले जाणार आहेत.
परंतु, आता शहरातील तब्बल ५०० हॉटेल व्यावसायिकांनी एकत्रित येऊन महापालिकेच्या अग्निशमन विभागाविरोधात असहकार पुकारला आहे. त्यानुसार, मंगळवारी दुपारी अचानक ४ वाजल्यापासून त्यांनी बंद पुकारला. महाराष्टÑ अग्निशमन कायद्यांतर्गत आम्ही सर्व प्रकारच्या अटींचे पालन केले आहे. तसेच बी फॉर्मदेखील भरून दिला आहे. असे असतानादेखील अग्निशमन विभागामार्फत रोजच्या रोज नवनवीन अटी काढल्या जात आहेत. त्यामुळे त्यांचा हा त्रास असह्य झाल्यानेच हा बंद पुकारल्याची माहिती हॉटेल तथा बार असोसिएशनने दिली. अग्निशमन विभागाच्या या जाचक अटींमुळे आम्हाला आमचा व्यवसाय बंद करण्याची वेळ आल्याचेही मत या व्यावसायिकांनी व्यक्त केले.

हॉटेल, बार सील करण्याची कारवाई सुरूच

महापालिकेच्या अग्निशमन दलाने नोटीस देऊनही त्यावर कोणतीही कार्यवाही न करणाºया ८६ हॉटेल व बारपैकी १३ हॉटेल व बार सील करण्याची कारवाई अग्निशमन विभागाने शनिवारी केली होती. त्यानंतर, सोमवारी पुन्हा शहरातील १३ आणि मंगळवारी १० हॉटेल, बार अग्निशमन दलाकडून सील करण्यात आले आहेत. त्यानुसार, तीन दिवसांत ३६ हॉटेल, बार, लाउंज सील केल्याचे पालिकेने स्पष्ट केले.

कम्पोडिंग चार्जेस भरण्यावरून सुरू आहे वाद
अग्निशमन दलामार्फत कोणत्याही प्रकारच्या नव्या अटीशर्ती टाकण्यात आलेल्या नाहीत. परंतु, कम्पोडिंग चार्जेस आणि अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव्ह चार्जेस भरण्याला या हॉटेल व्यावसायिकांचा विरोध असल्यानेच ते रद्द करण्यासाठी हा बंद पुकारल्याचे बोलले जात आहे.

आम्ही कोणत्याही प्रकारच्या जाचक अटी टाकलेल्या नाहीत. दोन महिन्यांपूर्वी ज्या अटीशर्ती मंजूर झाल्या, त्याच आजही आहेत. त्यामुळे नव्याने कोणत्याही अटीशर्ती टाकण्यात आलेल्या नाहीत.
- शशिकांत काळे, मुख्य अग्निशमन अधिकारी, ठामपा

बुधवारी आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यासमवेत दुपारी १२.३० वाजता चर्चा होणार असून त्यानंतर पुढील दिशा ठरवली जाणार आहे.
- रत्नाकर शेट्टी, हॉटेल-बार असोसिएशनचे ज्येष्ठ पदाधिकारी

Web Title:  Thanekar remained hungry due to the shutdown! Elgar against 500 hotel professionals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.