30 वर्षांनी महाराष्ट्र ऑलिम्पिकमध्ये ठाणेकर होणार सहभागी, ठाण्यातून सात खेळाडूंची निवड

By प्रज्ञा म्हात्रे | Published: December 28, 2022 03:36 PM2022-12-28T15:36:19+5:302022-12-28T15:39:31+5:30

         “सर्व खेळाडूंसाठी ही खूप चांगली संधी आहे. निधी व्यतिरिक्त इतर सर्व ज्युनियर ऍथलीट आहेत. हे सर्वांसाठी चांगले एक्सपोजर असेल. मला आशा आहे की आमची कामगिरी चांगली होईल.” असे प्रशिक्षक निलेश पाटकर यांनी सांगितले.

Thanekar to participate in Maharashtra Olympics after 30 years, seven athletes selected from Thane | 30 वर्षांनी महाराष्ट्र ऑलिम्पिकमध्ये ठाणेकर होणार सहभागी, ठाण्यातून सात खेळाडूंची निवड

30 वर्षांनी महाराष्ट्र ऑलिम्पिकमध्ये ठाणेकर होणार सहभागी, ठाण्यातून सात खेळाडूंची निवड

googlenewsNext

ठाणे - बालेवाडी, पुणे येथे महाराष्ट्र ऑलिम्पिक गेम्स २०२२-२३ ही स्पर्धा ४ आणि ५ जानेवारी २०२३ रोजी होत असून तब्बल ३० वर्षांनी ठाणे या स्पर्धेत सहभागी होत आहे. शहरातून सात खेळाडू या स्पर्धेसाठी सहभागी झाले असून विविध क्रीडा प्रकारांत ते चमकणार आहेत. 

महाराष्ट्र ऑलिम्पिक गेम्सची शेवटची आवृत्ती ३० वर्षांपूर्वी १९९२ मध्ये आयोजित करण्यात आली होती. ठाणे महापालिका प्रशिक्षण केंद्राचे सात खेळाडू महाराष्ट्र ऑलिम्पिक गेम्समध्ये सहभागी होत आहेत. निधी सिंग ४०० मीटर आणि ४०० मीटर अडथळा शर्यतीत पात्र ठरली आहे. आकांक्षा गावडे २०० मीटरमध्ये पात्र ठरली आहे. ईशा नेगी ४०० मीटर हर्डल्समध्ये पात्र ठरली आहे. निधी, सानिका, आकांक्षा आणि ईशा या ४ x १०० मीटर रिले आणि ४ x ४०० मीटर रिले संघाचा भाग असतील. हर्ष राऊत आणि निखिल ढाके हे पुरुष ४ x १०० मीटर रिले संघाचा भाग असतील. आल्फ्रेड फ्रान्सिस पुरुषांच्या ४ x ४०० मीटर रिले संघाचा भाग असेल. निधी म्हणाली, “राज्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंमध्ये ही चांगली स्पर्धा असेल. मी माझे सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करेन”. ईशाने सांगितले की, “मी वरिष्ठ खेळाडूंसोबत भाग घेत आहे ज्यामुळे मला माझा अनुभव वाढण्यास मदत होईल. हे खूप रोमांचक असेल.” आकांक्षा म्हणाली, “महाराष्ट्रातील सर्वोत्तम खेळाडूंसोबत धावण्याची ही चांगली संधी आहे. हंगामाच्या शेवटी चांगली स्पर्धा आहे.” 

         “सर्व खेळाडूंसाठी ही खूप चांगली संधी आहे. निधी व्यतिरिक्त इतर सर्व ज्युनियर ऍथलीट आहेत. हे सर्वांसाठी चांगले एक्सपोजर असेल. मला आशा आहे की आमची कामगिरी चांगली होईल.” असे प्रशिक्षक निलेश पाटकर यांनी सांगितले.
 

Web Title: Thanekar to participate in Maharashtra Olympics after 30 years, seven athletes selected from Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे