आयुष मंत्रालय, भारत सरकार तर्फे ठाण्यात प्रथमच राष्ट्रीय आरोग्य मेळा ठाणेकर अनुभवणार आयुर्वेदाची पंढरी

By प्रज्ञा म्हात्रे | Published: January 16, 2024 05:29 PM2024-01-16T17:29:29+5:302024-01-16T17:30:10+5:30

ठाणे पश्चिम येथे आयुर्वेदिक महासंमेलन संपन्न होणार आहे.

Thanekar will experience Ayurveda festival for the first time in Thane by Ministry of AYUSH, Government of India | आयुष मंत्रालय, भारत सरकार तर्फे ठाण्यात प्रथमच राष्ट्रीय आरोग्य मेळा ठाणेकर अनुभवणार आयुर्वेदाची पंढरी

आयुष मंत्रालय, भारत सरकार तर्फे ठाण्यात प्रथमच राष्ट्रीय आरोग्य मेळा ठाणेकर अनुभवणार आयुर्वेदाची पंढरी

प्रज्ञा म्हात्रे, ठाणे : आयुर्वेद सर्वांसाठी - जीवनशैलीजन्य विकारांच्या व्यवस्थापनातील नवीन दृष्टिकोन' हे तत्व स्वीकारून अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनच्यावतीने तसेच आयुष मंत्रालय, भारत सरकारच्या सहकार्याने राष्ट्रीय आरोग्य मेळा व ए.आय.ए.सी. कॉन २०२४ १९ ते २२ जानेवारी या कालावधीत सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत राम गणेश गडकरी रंगायतन व श्री समर्थ सेवक मंडळ, डॉ. मूस मार्ग, ठाणे पश्चिम येथे आयुर्वेदिक महासंमेलन संपन्न होणार आहे अशी माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली. 

महासंमेलानाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अध्यक्ष म्हणून पद्मश्री, पद्भूषण वैद्य देवेंद्र त्रिगुणा (अध्यक्ष, राष्ट्रीय आयुर्वेदिक विद्यापीठ आणि अखिल भारतीय आयुर्वेदिक महासंमेलन ट्रस्ट) आणि सरबानंद सोनोवल (केंद्रीय आयुष मंत्री), श्रीपाद नाईक (केंद्रीय मंत्री) डॉ. महेंद्र मुंजापरा (केंद्रीय आयुष राज्यमंत्री) यांच्यासह पद्मश्री वैद्य राजेश कोटेचा (सेक्रेटरी, मिनिस्ट्री ऑफ आयुष, भारत सरकार), श्रीमती आरती अहुजा (सेक्रेटरी, मिनिस्ट्री ऑफ लेबर अॅण्ड एम्प्लॉयमेंट, भारत सरकार), वैद्य जयंत देवपुजारी (चेअरमन, नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टम्स ऑफ मेडिसीन), डॉ. मनोज नेसारी (अॅडव्हायजर (आयुर्वेद) मिनिस्ट्री ऑफ आयुष, भारत सरकार) आणि वैद्य राकेश शर्मा (प्रेसिडेंट, बोर्ड ऑफ इथिक्स अँण्ड रजिस्ट्रेशन, एनसीआयएसएम) आदी मान्यवर पहिल्या दिवशी सकाळी १० वा. उपस्थित राहणार आहेत. आयुर्वेदीक सर्वांसाठी या संकल्पनेवर आधारीत हा आरोग्य मेळा असून या संमेलनात आयुर्वेदीक झाडांचे प्रदर्शन अनुभवयाला मिळणार आहे. 

तणाव नियोजन, वेदना व्यवस्थापन, योग आणि आयुर्वेद, संधिविकार व्यवस्थापन, योग आणि सत्वावजय चिकित्सा, स्वस्थ जीवनासाठी आयुर्वेद, आयुर्वेदातून रोगप्रतिकारशक्ती, आयुर्वेदातील त्वचा व केसांची काळजी, स्त्री विकारांचे व्यवस्थापन, पचन विकारांचे व्यवस्थापन आयुर्वेदिक दिनचर्या व स्वास्थ्यपूर्ण आहार, सामान्य जीवनशैलीजन्य विकारांचे व्यवस्थापन या विषयांवर आयुर्वेदिक तज्ञांची मार्गदर्शक व्याख्याने आयुर्वेदिक महासंमेलनात होणार आहेत.नागरिकांसाठी, कायचिकित्सा / जनरल मेडिसीन, त्वचाविकार, योग व डाएट, सर्जरी, स्त्रीरोग, बालरोग, नेत्ररोग, कान-नाक-घसा आदी आजारांवर मोफत रुग्ण तपासणी करण्यात येणार आहे. आयुर्वेदिक सल्ला देण्यात येणार असून ओपीडी सुद्धा उपलब्ध असणार आहे. आयुर्वेदिक तज्ञांमार्फत ही तपासणी विनामूल्य केली जाणार आहे. या पत्रकार परिषदेला वैद्य राजेंद्रप्रसाद शर्मा, डॉ. ज्योती भोजने, वैद्य किरण पंडीत उपस्थित होते.

Web Title: Thanekar will experience Ayurveda festival for the first time in Thane by Ministry of AYUSH, Government of India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.