ठाणेकरांना सोसावी लागणार पुढील आठवडाभर पाण्याची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 04:06 PM2018-10-04T16:06:03+5:302018-10-04T16:09:14+5:30

पिसे बंधाऱ्याजवळ दुरुस्तीचे काम आणखी आठ दिवस सुरु राहणार असल्याने त्याचा फटका आता ठाणेकरांना सोसावा लागणार आहे. पुढील आठ दिवस ठाणे शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.

Thanekar will have to undergo the next week's water scarcity | ठाणेकरांना सोसावी लागणार पुढील आठवडाभर पाण्याची झळ

ठाणेकरांना सोसावी लागणार पुढील आठवडाभर पाण्याची झळ

Next
ठळक मुद्देवॉल दुरुस्तीचे काम अद्यापही सुरुमहापालिका उचलते २०० दक्षलक्ष लीटर पाणी

ठाणे - शहरातील विविध भागात पाणी समस्येवरुन स्थायी समितीच्या बैठकीत नुकताच गदारोळ झाला असातांना आता पुढील आठवडाभर ठाणेकरांना पाण्याची झळ सोसावी लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. भातसा नदीच्या पिसे बंधाऱ्याजवळ दुरु स्तीचे काम सुरु असल्यामुळे मागील आठ दिवसांपासून ठाणेकरांनापाणी संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यात या दुरु स्तीचा कामासाठी आणखी एक आठवडा लागणार आहे. त्यामुळे पुढील आठवडाभर शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे ठाणेकरांपुढे पाणी संकट उभे ठाकले आहे.
                          बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत बाळकुम, वर्तकनगर, कोपरी आणि दिव्यातील पाणी समस्येला स्थानिक लोकप्रतिनिधींनी वाचा फोडली होती. परंतु आता पाणी समस्येचे ढग आता आणखी गडद होणार आहेत. ठाणे जिल्ह््यातील धरणांमधून मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या शहरांना पाणी पुरवठा करण्यात येतो. यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह््यातील सर्वच धरण काठोकाठ भरलेली आहेत. त्यामुळे धरण क्षेत्रात मुबलक पाणी असतानाही बंधारा दुरु स्तीच्या कामामुळे ठाणेकरांपुढे पाणी संकट उभे राहीले आहे. मुंबई आणि ठाणे महापालिका भातसा नदीवरील पिसे बंधाऱ्याजवळून पाणी उचलून त्याचे शहरात वितरण करते. या बंधाऱ्यातून मुंबई महापालिकेकडून दररोज दोन हजार दशलक्षलीटर तर ठाणे महापालिकेकडून २०० दशलक्षलीटर इतके पाणी घेते. ठाणे महापालिका विविध स्त्रोतांमार्फत पाणी घेऊन त्याचे शहरात वितरण करते. त्यापैकी महापालिकेच्या स्वत:च्या योजनेसाठी या बंधाऱ्यातून पाणी उचलते. गेल्या आठ दिवसांपासून या बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम सुरु असून त्यामुळे ठाणे महापलिकेला नदी पात्रातून पुरेसे पाणी उचलणे शक्य होत नाही. पावसाळ्यानंतर पाण्याची पातळी कमी होऊ नये म्हणून दरवर्षी मुंबई महापालिकेकडून बंधाऱ्याच्या ‘बलुन वॉल’ची दुरु स्ती करण्यात येते. याच वॉलच्या दुरु स्तीचे काम मुंबई महापालिकेने सुरु केले असून या कामासाठी आणखी आठ दिवस लागणार आहेत. या दुरु स्तीच्या कामाचा फटका ठाणे शहरातील पाणी पुरवठ्यावर होऊ लागला असून यामुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे उपनगर अभियंता रविंद्र खडताळे यांनी गुरूवारी पिसे बंधाऱ्याजवळील दुरु स्ती कामाची पाहाणी केली. या पाहाणी दरम्यान मुंबई महापालिकेच्या यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता गोडबोले यांच्याकडून कामाचा आढावा घेऊन पाणी पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्याची मागणी केली आहे.



 

Web Title: Thanekar will have to undergo the next week's water scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.