पुरामुळे कोल्हापूरच्या दुधाला मुकणार ठाणेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:33 AM2021-07-25T04:33:50+5:302021-07-25T04:33:50+5:30
ठाणे : कोकणाप्रमाणे कोल्हापूरमध्येदेखील अतिवृष्टी झाल्याचा फटका दुधाच्या आवक यावर होणार आहे. कोल्हापूरमधून केवळ ३० टक्केच ठाण्याला दूध मिळणार ...
ठाणे : कोकणाप्रमाणे कोल्हापूरमध्येदेखील अतिवृष्टी झाल्याचा फटका दुधाच्या आवक यावर होणार आहे. कोल्हापूरमधून केवळ ३० टक्केच ठाण्याला दूध मिळणार असून, रविवारी कोल्हापूरच्या दुधाला ठाणेकरांना मुकावे लागणार आहे.
दुधाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरला अतिवृष्टीचा पुन्हा एकदा फटका बसला असून, तेथेदेखील पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्व रस्ते बंद झाले आहेत. कोल्हापूरवरून येणाऱ्या गोकुळ, वारणा आणि काहीसा अमूलला फटका बसणार आहे. येथून फक्त ३० टक्के दूध येणार असून, दुधाचा तुटवडा भरून काढण्यासाठी इतर कंपन्यांच्या दुधाची विक्री होणार असल्याचे ठाणे शहर दूध व्यावसायिक कल्याणकारी संस्थेचे सहसचिव पांडुरंग चोडणेकर यांनी सांगितले. ठाणे शहरात साडेपाच ते सहा लाख दररोज दूध येते. गोकुळ दुधाची सर्वाधिक खरेदी होत असल्याचे ते म्हणाले.