ठाणेकर रविवारी या मार्गाने बिनधास्त धावणार, मॅरेथॉनमार्गावर अशी असेल व्यवस्था
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 12:55 PM2023-11-30T12:55:22+5:302023-11-30T12:56:08+5:30
Mahamarathon : ठाणेकरांमध्ये मुंबई महामॅरेथॉनच्या मार्गाबद्दल कमालीची उत्सुकता आहे आणि उत्सुकता जसजसे दिवस जवळ येत आहे तसतशी शिगेला पोहोचली आहे.
ठाणे : ठाणेकरांमध्ये मुंबई महामॅरेथॉनच्या मार्गाबद्दल कमालीची उत्सुकता आहे आणि उत्सुकता जसजसे दिवस जवळ येत आहे तसतशी शिगेला पोहोचली आहे. आपण नेमके कोणत्या मार्गावरुन धावणार याची विचारणा ठाणेकर करीत होते. त्याचा सस्पेन्स अखेर संपला आहे. वेगवेगळ्या अंतराच्या या चार अंतराच्या महामॅरेथॉनमध्ये धावपटू कोणत्या मार्गाने धावणार याची माहिती जाहीर झाली आहे. त्यामुळे येत्या रविवारी ठाणेकर बिनधास्त धावणार आहेत.
असा असेल महामॅरेथॉनचा मार्ग
२१ किमी
रेमंड कंपनी गेट - उपवन तलाव - बिर्सा मुंडा चौक - वसंत विहार - हिरानंदानी मेडोज - नीळकंठ ग्रीन्स - मुल्ला बाग ते पुन्हा रेमंड कंपनी गेट
१० किमी अंतर
रेमंड कंपनी गेट - उपवन तलाव - बिर्सा मुंडा चौक - वसंत विहार सर्कल - ८४ कल्पवृक्ष इमारतीपासून पुन्हा रेमंड कंपनी गेट
५ किमी अंतर
रेमंड कंपनी गेट - उपवन तलाव - पायलादेवी मंदिरापासून पुन्हा रेमंड कंपनी गेट
३ किमी अंतर
रेमंड कंपनी गेट - शिवाईनगर - सिझन बँक्वेटपासून पुन्हा रेमंड कंपनी गेट-
विविध मार्गांवर असेल एन्टरटेनमेंट झोन
धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी विविध संस्थांचे एन्टरटेनमेंट झोन असणार आहेत. अभिनय कट्ट्याच्यावतीने लावणी आणि गीतांचे सादरीकरण, ठाणे महापालिकेच्यावतीने जिन्मॅस्टीक्सचे प्रात्यक्षिक, आर एन डान्स अँड फिटनेसच्यावतीने झुंबा, स्वत्वच्यावतीने ड्रमवादन, डॉ. पल्लवी नाईक यांच्यावतीने भरतनाट्यम, थिराणी शाळेचे बँड वादन, राज वनमाळी आणि ग्रुप आणि सुरज डान्स ग्रुपच्यावतीने विविध बॉलीवूड गाण्यांवर नृत्यांचे सादरीकरण, स्वस्तिक शिवकालीन शस्त्रकला पथक ठाणे यांचे लाठीकाठीचे सादरीकरण, संगीतप्रेमी परिवाराच्यावतीने सादरीकरण.
मॅरेथॉनमार्गावर अशी असेल व्यवस्था
१ ते २१ किमीच्या अंतरावर दहा ठिकाणी पाण्याची व्यवस्था असेल.
४ ठिकाणी टॉयलेट
८ ॲम्ब्युलन्स असणार
१४ फिजीओथेरपिस्ट असणार
६ ठिकाणी मेडीकल झोन
८ ठिकाणी प्रथमोपचार किट तसेच फायर ब्रिगेड आपल्या सेवेत उपलब्ध असणार