ठाणेकरांची उत्तुंग दाद!
By admin | Published: February 8, 2016 02:34 AM2016-02-08T02:34:58+5:302016-02-08T02:34:58+5:30
ठाण्यात पहिल्यांदा पार पडलेल्या सायकल स्पर्धेवर पुरूष गटात अलिबागच्या निकेत पाटील याने तर महिला गटात पुण्याच्या प्रिताली शिंदे यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
ठाणे : ठाण्यात पहिल्यांदा पार पडलेल्या सायकल स्पर्धेवर पुरूष गटात अलिबागच्या निकेत पाटील याने तर महिला गटात पुण्याच्या प्रिताली शिंदे यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले. ठाणे महानगरपालिका आयोजित कला क्र ीडा महोत्सवांतर्गत रविवारी झालेल्या सायकल स्पर्धेला ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी २०० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते.
ठाणे जिल्हा मेचअर सायकलिंग असोसिएशन, मुंबई जिल्हा मेचअर असोसिएशन आणि एलसीपी सायकलिंग ग्रुप यांच्या संयुक्तविद्यमाने या स्पर्धेचे आयोजन क रण्यात आले. तीन हात नाका येथून सायकल स्पर्धेला सुरूवात झाली. या स्पर्धेचे उद्घाटन महापौर संजय मोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी नौपाडा प्रभाग समिती अध्यक्ष हिराकांत फर्डे, ज्येष्ठ नगरसेवक दशरथ पालांडे, क्र ीडा अधिकारी मीनल पालांडे आदी उपस्थित होते.
महिला व पुरु ष (खुली) ७० कि.मी.च्या सायकल स्पर्धेची सुरूवात तीन हातनाका येथून झाली. एल आय सी टर्मिनल, नितीन कंपनी उड्डाणपूल, ज्युपिटर हॉस्पिटल, गोल्डन डाईज जंक्शन उड्डाणपूल, माजिवडा पेट्रोल पंप उड्डाणपूल, मानपाडा उड्डाणपूल, पातलीपाडा उड्डाणपूल, पुढे निमुळता रस्ता, वाघबीळ उड्डाणपूल, कॉसमॉस, डी-मार्ट सिग्नल, आनंदनगर सिग्नल, कासारवडवली यू टर्न पॉईट, कापूरबावडी उड्डाणपूल, इस्टर्न एक्सप्रेस हायवेवरु न सरळ, नितिन कंपनी उड्डाणपूलामार्गे परत तीनहात नाका मार्गे अशा तीन फेऱ्या पूर्ण करणे असा स्पर्धेचा मार्ग होता. अंतिम रेषा ही शेवटच्या फेरीत तीन हात नाका येथे होती. तर २२ कि.मी सायकल स्पर्धेला तीन हात नाका येथून सुरूवात झाली. एलआयसी टर्मिनल, नितीन कंपनी उड्डाणपूल, ज्युपिटर हॉस्पिटल, गोल्डन डाईज जंक्शन उड्डाणपूल, माजिवडा पेट्रोल पंप उड्डाणपूल, विहंग हॉटेल सिग्नल, मानपाडा उड्डाणपूल, ब्रह्मांड नाका सिग्नल, पातलीपाडा उड्डाणपूल, पुढे निमुळता रस्ता, वाघबीळ उड्डाणपूल, कॉसमॉस डी मार्ट सिग्नल, आनंदनगर सिग्नल, कासारवडवली यू टर्न पॉईट, कापूरबावडी उड्डाणपूल, इस्टर्न एक्सप्रेस हायवेवरु न सरळ, नितिन कंपनी उड्डाणपूलमार्गे तीन हातनाका येथे स्पर्धेची अंतिम रेषा ठेवण्यात आली होती.
खुल्या ७० कि.मी स्पर्धेत पुरूष गटातून निकेत श्रीकांत पाटील (अलिबाग) याने प्रथम, दिलीप मार्तंड माने (सांगली) याने व्दितीय, जमादार शब्बीर जमादार (सांगली) याने तृतीय क्र मांक पटकाविला.
खुल्या ७० कि.मी स्पर्धेच्या महिला गटातून प्रिताली शिंदे (पुणे) हिने प्रथम, पूजा कश्यब (मुंबई) हिने व्दितीय, चैताली शिळदणकर (अलिबाग) हिने तृतीय क्र मांक पटाकाविला. २२ कि.मी हौशी सायकल स्पर्धेत पुरूष गटातून प्रथम क्र मांक कुणाल परदेशी, व्दितीय क्र मांक अमर पटेल, तृतीय क्र मांक अनुज फडके यांनी पटकाविला.
२२ कि.मी हौशी सायकल स्पर्धेत महिला गटातून अमिषा शहा हिने प्रथम, व्दितीय क्र मांक सरिता वॉयलेट तर तृतीय क्र मांक पुजा पाटेकर हिने पटकाविला.