ठाणेकरांची कृत्रिम तलावांना पसंती; आतापर्यंत २७ हजार ४९४ बाप्पांचे विसर्जन
By अजित मांडके | Published: September 6, 2022 03:19 PM2022-09-06T15:19:56+5:302022-09-06T15:20:13+5:30
यावर्षी महापलिकेने निर्माण केलेल्या या पर्यायी व्यवस्थेचा लाभ उठवित शहरामधील हजारो भाविकांनी आपल्या गौरी गणपतीचे भक्तीमय वातावरणात विधिवत विसर्जन केले.
ठाणे : तलावांचे प्रदुषण रोखण्यासाठी ठाणो महापालिकेने सुरु केलेल्या कृत्रिम तलावांच्या संकल्पनेला ठाणेकरांनी यंदा चांगली पंसती दिली असल्याचे दिसून आले आहे. दिड दिवस, पाच दिवस आणि सहा दिवसांच्या बाप्पांचे विसजर्न महापालिकेच्या कृत्रिम तलाव आणि विसजर्न घाटांच्या ठिकाणी आतार्पयत २७ हजार ४९४ करण्यात आले. एकूणच महापालिकेच्या पर्यावरणभिमुख संकल्पनेला ठाणेकरांनी पसंती दिल्याचे दिसून आले आहे.
ठाणे महानगरपालिकेच्यावतीने शहरात दीड दिवस, पाच दिवस, गौरीगणपती विसर्जन, सात दिवस आणि दहा दिवसाच्या सार्वजनिक गणोश विसर्जनासाठी पर्यायी गणोश विसर्जन व्यवस्था तयार केली आहे. या व्यवस्थेतंर्गत रायलादेवी येथे दोन, आंबेघोसाळे, उपवन पालायदेवी, निळकंठ वुड्स टिकुजीनी वाडी-बाळकुम रेवाळे, खारेगाव आदी ठिकाणी कृत्नीम तलावांची व्यवस्था महापालिकेने उपलब्ध करु न दिली आहे. तर पारसिक रेतीबंदर विसर्जन महाघाट आणि कोलशेत महाघाट याबरोबरच मिठबंदर, कळवा, गायमुख येथे विसर्जन महाघाट निर्माण केले आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मासुंदा तलाव येथील दत्तघाट येथेही पर्यायी विसर्जन व्यवस्था करण्यात आली आहे. त्याशिवाय मासुंदा तलावाच्या अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यालगत असलेल्या घाटावर ही गणोश मुर्ती स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
यावर्षी महापलिकेने निर्माण केलेल्या या पर्यायी व्यवस्थेचा लाभ उठवित शहरामधील हजारो भाविकांनी आपल्या गौरी गणपतीचे भक्तीमय वातावरणात विधिवत विसर्जन केले. या पर्यायामुळे तलावांचे प्रदुषण मागील काही वर्षात कमी झाले आहे. तलावात थेट मुर्ती विसजर्न केल्याने तलावात गाळ तयार होऊन प्रदुषणात वाढ होत होती. मात्र महापालिकेने सुरु केलेल्या नव्या संकल्पनेला ठाणोकरांनी पसंतीची मोहर देत बाप्पांचे विसजर्न कृत्रिम तलावात केले आहे. त्यानुसार ठाण्यात दिड दिवसांच्या ११ हजार ६०२, पाच दिवसांचे ३७६० आणि सहा दिवसांचे १२ हजार १३२ बाप्पांचे विसजर्न पालिकेच्या पर्यायी कृत्रिम तलावात करण्यात आल्याचे दिसून आले आहे.