ठाणेकरांनी कोरोनाचे निर्बंध पायदळी तुडवले, मार्केटमध्ये गर्दी, वाहतुकीची कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 04:06 PM2021-06-07T16:06:45+5:302021-06-07T16:07:04+5:30

मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आनंद नगर टोलनाक्यावर पुन्हा एकदा वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या. काही नागरीक तर बिनधास्त तोंडाला मास्क न लावताच फिरतांना दिसत होते.

Thanekars trampled on Corona restrictions, crowds in the market, traffic jams | ठाणेकरांनी कोरोनाचे निर्बंध पायदळी तुडवले, मार्केटमध्ये गर्दी, वाहतुकीची कोंडी

ठाणेकरांनी कोरोनाचे निर्बंध पायदळी तुडवले, मार्केटमध्ये गर्दी, वाहतुकीची कोंडी

Next
ठळक मुद्देमुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आनंद नगर टोलनाक्यावर पुन्हा एकदा वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या. काही नागरीक तर बिनधास्त तोंडाला मास्क न लावताच फिरतांना दिसत होते.

ठाणे : राज्य शासनाने कोरोनाचे निर्बंध शिथील केल्यानंतर सोमवारी अनलॉकच्या पहिल्याच दिवशी ठाण्यातील विविध बाजारपेठांमध्ये गर्दीचा जणू पुरच आल्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे कोर्टनाका ते थेट स्टेशन पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले. सोशल डिस्टन्सिंगचे कुठेही पालन होतांना दिसले नाही, कि गर्दीची ठिकाणे टाळली पाहिजेत याचेही भान ठाणेकरांना राहिले नसल्याचेच दिसून आले. लोकल प्रवास अद्याप बंद असतानाही शहराच्या विविध भागात वाहतुक कोंडी दिसून आली. आनंद नगर टोलनाक्यावर देखील सकाळच्या सत्रत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. एकूणच अनलॉकच्या पहिल्याच दिवशी ठाणोकरांना कोरोनाचे र्निबध पायदळी तुडवल्याचे दिसून आले.

कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने, १८ जिल्ह्यातील  र्निबध शिथील करण्यात आले आहेत. त्यानुसार निर्बंध हटविण्याचे पाच स्तर करण्यात आले आहेत. त्यानुसार ठाणो शहर हे दुस:या स्तरात मोडले गेले आहे. त्यानुसार सोमवार पासून अत्यावश्यक सह इतर आस्थापनाही सुरु झाल्या, रस्त्यांच्या कडेला फेरीवाल्यांची संख्या अचानक पाच पटीने वाढल्याचे दिसून आले. शहरातील विविध रस्त्यांना लावण्यात आलेले बॅरीकेट्स हटविण्यात आले. त्यामुळे वाहनांचा वेग वाढून वाहने सुसाट निघू लागली. परंतु यामुळे शहराच्या विविध भागात वाहतुक कोंडीचे चित्र दिसून आले. 

मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आनंद नगर टोलनाक्यावर पुन्हा एकदा वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या. काही नागरीक तर बिनधास्त तोंडाला मास्क न लावताच फिरतांना दिसत होते. मॉर्निग वॉक, संध्याकाळचा वॉकही मास्कविनाच सुरु असल्याचे दिसून आले. शहरातील सलून, जीम सुरु झाल्या, मॉल, शॉपींग सेंटरही ५० टक्के क्षमतेने सुरु झाले आहेत. परंतु, याठिकाणी देखील खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसत होती. सलुनमध्ये कोरोनाचे नियम पाळले जात असल्याचे दिसत होते. काही ठिकाणी पीपीई कीट घातल्याचे दिसत होते. तर काही ठिकाणी येणाऱ्या ग्राहकांसाठी खुर्ची सतत सॅनिटाईज केली जात होती. तसेच जीममध्ये देखील सॅनिटायझर करुनच सराव करु दिला जात होता.

ठाण्यातील जांभळी नाका मार्केटमधील सर्वच दुकाने आता खुली झाल्याने या ठिकाणी पावसाळी खरेदीसाठी नागरीकांची एकच झुंबड उडाल्याचे दिसून आले. चपला, रेनकोट, छत्री, ताडपत्री घेण्यासाठी नागरीकांची गर्दी वाढतांनाच दिसत होती. त्यामुळे कुठेही सोशल डिस्टेंसींगचे पालन होतांना दिसले नाही. तसेच या ठिकाणी रस्त्याच्या कडेला बसलेल्या फेरीवाल्यांचाही त्रस वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे सकाळपासून या भागात वाहतुक कोंडी होताना दिसली. मार्केटमधून परिवहनच्या बसेस यापूर्वी कोणतीही वाहतुक कोंडी न होता सुरळीतपणो सुरु होत्या. परंतु, सोमवारी अनलॉक होताच, कोर्टनाक्यापासून ते थेट स्टेशन र्पयत केवळ गर्दीमुळे या भागात वाहतुक कोंडी झाल्याचे दिसून आले. हेच चित्र चिंतामणी चौक ते स्टेशनपर्यंत दिसून आले. त्यामुळे, या भागात गर्दी आणि वाहतुक कोंडीमुळे अक्षरश: कोरोनाचे निर्बंध पायदळी तुडवल्याचे दिसत होते.
 

Web Title: Thanekars trampled on Corona restrictions, crowds in the market, traffic jams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.