ठाणेकरांचे पाणी महागणार; दरात 50 टक्के वाढ होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 12:17 AM2018-12-11T00:17:49+5:302018-12-11T06:50:39+5:30

पावसाने आखडता हात घेतल्याने, मुंबई शहर आणि उपनगरवासियांना पाणीकपातीस सामोरे जावे लागत असतानाच, आता ठाण्याला पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्याच्या दरात ५० टक्के वाढ करण्यात येणार आहे.

Thanekar's water will increase; 50 percent increase in rates | ठाणेकरांचे पाणी महागणार; दरात 50 टक्के वाढ होणार

ठाणेकरांचे पाणी महागणार; दरात 50 टक्के वाढ होणार

Next

मुंबई : पावसाने आखडता हात घेतल्याने, मुंबई शहर आणि उपनगरवासियांना पाणीकपातीस सामोरे जावे लागत असतानाच, आता ठाण्याला पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्याच्या दरात ५० टक्के वाढ करण्यात येणार आहे. परिणामी, ठाणेकरांचे पाणी महागणार आहे. महत्त्वाचे म्हणजे मुंबईला ठाण्यातील धरणांमधूनच पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे ठाण्याच्या भरवशावरच तहान भागवायची आणि ठाणेकरांवरच दरवाढ लादायची, असा हा प्रकार असल्याने संताप व्यक्त होत आहे.

मुंबई महापालिकेने घेतलेल्या या दरवाढीच्या निर्णयामुळे वर्षागणिक १४.५८ कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल प्राप्त होणार आहे. तब्बल १५ वर्षांनंतर ही दरवाढ करण्यात येणार आहे. महापालिका प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईसाठी दररोज ३,८०० दशलक्ष लीटर पाणी लागते. मोडकसागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, विहार आणि तुलसी या सात धरणांतून हा पाणीपुरवठा केला जातो. यामधील १५० दशलक्ष लीटर पाणी हे ठाणे आणि भिवंडीला दिले जाते.

पालिका हद्दीत लागू असलेले दर, नगरबाह्य विभागास लागू असलेले दर आणि महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण विभागाद्वारे महापालिकेला लागू असलेल्या दरांनुसार ही दरवाढीची सुधारणा करण्यात येणार आहे. त्यानुसार, पाणी पुरवठ्याच्या दरात ५० टक्के दरवाढ करण्यात येणार आहे. ठाणे पालिका क्षेत्रास आवश्यक ७०० दशलक्ष लीटर पाणी एमआयडीसी पुरवते. मुंबई महापालिकेकडून दररोज १५० दशलक्ष लीटर पाणी पुरविले जाते. दरम्यान, पाण्याची दरवाढ महानगरपालिकेच्या मंजुरीच्या दिनांकापासून ३० दिवसांनी आणि ९० दिवसांपूर्वी अंमलबजावणी होणार आहे.

Web Title: Thanekar's water will increase; 50 percent increase in rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.