रन फॉर व्होटच्या ‘मतदान’ जागृती रॅलीत ठाणेकर युवा-युवतींचा उत्स्फुर्त सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 04:47 PM2019-04-19T16:47:53+5:302019-04-19T16:56:44+5:30
सकाळी ७ वाजताच काढलेल्या या ‘रन फॉर व्होट’च्या दौड रॅलीला ठाणे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी हिरवा झेंडा दाखवला. या ‘रन फॉर व्होट’ माध्यमातून यातील स्पर्धकांनी सकाळीच ठाणेकरांना २९ एप्रिल रोजी मतदान करण्याचे आवाहन केले. मतदान जनजागृती दौडच्या या स्वीप उपक्रमात ठाणेकर धावपटूंनी शेकडोंच्या संख्येने सहभागी होऊन मतदारांमध्ये मतदानाची जनजागृती केली.
ठाणे : जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंती या तिन्ही लोकसभा मतदारसंघात मतदारांनी उत्स्फुर्तपणे ‘मतदान’ प्रक्रियेत सहभाग घ्यावा, मतदानाचा हक्क त्यांनी बजवावा. या जनजागृतीसाठी ठाणे जिल्हा प्रशासनाकडून मोठ्याप्रमाणात जनजागृतीचा स्वीप उपक्रम हाती घेतले आहेत. त्यापैकी शुक्रवारी या ‘रन फॉर व्होट’ साठी तीन किमी.दौड रॅली काढली असता त्यात ठाणेकरांनी उत्स्फुर्तपणे मोठा सहभाग घेऊन मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन केले.
सकाळी ७ वाजताच काढलेल्या या ‘रन फॉर व्होट’च्या दौड रॅलीला ठाणे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी हिरवा झेंडा दाखवला. या ‘रन फॉर व्होट’ माध्यमातून यातील स्पर्धकांनी सकाळीच ठाणेकरांना २९ एप्रिल रोजी मतदान करण्याचे आवाहन केले. मतदान जनजागृती दौडच्या या स्वीप उपक्रमात ठाणेकर धावपटूंनी शेकडोंच्या संख्येने सहभागी होऊन मतदारांमध्ये मतदानाची जनजागृती केली. येथील कोर्ट नाका परिसरात सकाळी ७ वाजता ही दौड आयोजित केली होती. या दौड उत्साहात ठाणेकरांसह जिल्हा प्रशासनातले अधिकारी कर्मचारी, तसेच धावपटू मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी, स्वीप उपक्र म नोडल अधिकारी रेवती गायकर, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनार आदी अधिकाऱ्यांसह धावपटूनीं या दौडमध्ये मोठ्यासंख्येने सहभाग घेतला.
या मतदान दौड रॅलीच्या प्रारंभी रंगीत फुगे हवेत सोडण्यात आले व झेंडा दाखवून दौड ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळून सुरू करण्यात आली. यानंतर ही दौड रॅली जांभळीनाका, दगडीशाळा, गजानन महाराज चौक, तीन प्रेट्रोल पंप, साईबाबामंदिर, घंटाली मंदिर, राममारु ती रोड, न्यू इंग्लिश स्कूल,गडकरी रंगायतन आदी मार्गांनंतरही दौड रॅली परत दगडी शाळा, जांभळी नाका, भवानी चौक आणि पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालय येथे येऊन या दौड स्पर्धेचा समारोप झाला. या दौड स्पर्धेत धावून आलेल्या धावपटूंनाठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी स्वत: पदक देऊन स्वागत केले. त्यानंतर सर्व सहभागी धावपटूंना अल्पोपहार देऊन नंतर या उपक्र माची सांगता झाली. यात सहभागी धावपटूंना ‘मतदान’ जनजागृतीच्या टोप्या, टीशर्ट, पोस्टर यावेळी जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले होते. या दौड रॅलीत युवा - युवतींसह ठाणेकर नागरिकांनी देखील मोठ्यासंख्येने सहभाग घेतला.
............
फोटो - १९ठाणे रन फॉर व्होट