ठाण्यातील १२०० युनिट शौचालये ब्रॅन्ड ठाण्याच्या रंगात रंगणार, २० दिवसात केले जाणार बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 06:05 PM2017-12-11T18:05:38+5:302017-12-11T18:11:02+5:30
ठाणे महापालिकेने शहरातील १२०० युनिट शौचालये ब्रॅन्ड ठाण्याच्या रंगात रंगविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुढील २० दिवसात ही शौचालये रंगविली जाणार असून त्यावर ब्रॅन्ड ठाण्याचा लोगो देखील प्रकाशित केला जाणार आहे.
ठाणे - स्वस्छ भारत अभियनाचा एक भाग म्हणून ठाणे महापालिकेने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यानुसार शहरातील शौचालयांच्या दुरुस्तीची मोहीम देखील पालिकेने हाती घेतली आहे. परंतु या शौचालयांना एक वेगळी ओखळ निर्माण व्हावी या उद्देशाने, ठाणे महापालिकेने आणखी एक पाऊल उचलले आहे. शहरातील तब्बल १२०० युनिटला आता ब्रॅन्ड ठाण्याच्या रंगसंगीतमध्ये रंगविले जाणार आहे. तसेच ब्रॅन्ड ठाण्याचा लोगो देखील प्रत्येक शौचालयावर लावण्याचा निर्णय घेण्यात आला असून पुढील २० दिवसात ही मोहीम पालिकेने फत्ते करण्याचा निर्णय घेतला आहे.
ठाणे महापालिकेच्या वतीने स्वच्छेतेच्या बाबतीत विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यामध्ये १०० किलो कचºयाचे वर्गीकरण यापुढे त्याच सोसायटींना लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच जे नगरसेवक आपल्या प्रभागात स्वच्छेतेची कामे करतील त्या टॉप १० नगरसेवकांना २५ लाखांचा अतिरिक्त निधी देण्याचे पालिकेने निश्चित केले आहे.
- ब्रॅन्ड ठाण्याच्या रंगसंगतीमध्ये हे शौचालये रंगविले जात असतांनाच ही शौचालये आता तुम्ही गुगलद्वारे देखील सर्च करु शकणार आहात. एका क्लिकमध्ये कोणत्या भागात कोणते शौचलय आहे, हे पाहण्याची संधी मिळणार आहे. ही शौचालये आता जीओटॅगींगद्वारे पाहण्याची संधी मिळणार असून त्याचे कामही आता सुरु झाले आहे.
दरम्यान आता शौचालयांच्या दुरुस्तीची मोहीम देखील पालिकेने हाती घेतली आहे. त्यानुसार या शौचालयांचा सर्व्हे देखील सुरु झाला आहे. मोठ्या स्वरुपाची कामे पुढील टप्यात करण्यात येणार आहेत. परंतु पहिल्या टप्यात आता याठिकाणी जाण्यासाठी पायवाट सुस्थितीत केली जाणार आहे. तसेच त्याठिकाणी वीज आणि पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे. याशिवाय या सुविधा देत असतांनाच या शौचालयांना एका रंग संगतीत जोडण्याचा महत्वपूर्ण निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार यासाठी तब्बल ४० अभियंत्याची फौज तयार करण्यात आली आहे. प्रत्येक अभियंता आता शहरातील शौचालयांची पाहणी करणार आहेत. त्यानुसार पुढील २० दिवसात शहरातील १२०० युनिट शौचालये ठाण्याच्या ब्रॅन्ड ठाण्याच्या रंगसंगतीत रंगविले जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. याशिवाय महिलांसाठी वेगळे आणि पुरुषांसाठी वेगळे शौचालय असा उल्लेख देखील मोठ्या आणि ठळक स्वरुपात केला जाणार आहे.