ठाण्यात ८१ हजार मतदारांची ‘नोटा’ ला पसंती

By Admin | Published: February 27, 2017 03:32 AM2017-02-27T03:32:48+5:302017-02-27T04:25:02+5:30

ठाणे महानगरपालिका निवडणुकांचे यंदाचे निकाल अनेक प्रकारे आश्चर्यचकीत करणारे ठरले आहेत

Thane's 81 thousand voters prefer 'Nota' | ठाण्यात ८१ हजार मतदारांची ‘नोटा’ ला पसंती

ठाण्यात ८१ हजार मतदारांची ‘नोटा’ ला पसंती

googlenewsNext


ठाणे : ठाणे महानगरपालिका निवडणुकांचे यंदाचे निकाल अनेक प्रकारे आश्चर्यचकीत करणारे ठरले आहेत. दिग्गज नेत्यांच्या पराभवापासून ते मोठ्याप्रमाणात ‘नोटा’ पर्यायाचा वापर हे यंदाच्या निवडणुकीचे मुख्य आकर्षण ठरले आहे. विशेष म्हणजे मुंबई महापालिका निवडणुकीत मुंबईकरांनी २२७ प्रभागांमध्ये जवळपास ७२ हजार मुंबईकरांनी उमेदवारांना मतदान करण्याऐवजी ‘नोटा’ला अधिक पसंती दिली आहे. मुंबईच्या तुलनेत ठाण्यात ३३ प्रभागातील १३१ जागांसाठी तब्बल ८१ हजार ८८८ ठाणेकरांनी उमेदवाराऐवजी ‘नोटा’वर आपली मोहर उमटवली आहे.
अनेक प्रभागांमध्ये उमेदवार निवडण्याऐवजी मतदारराजाने ‘नोटा’चा पर्याय स्वीकारल्याचे दिसत आहे. ‘नोटा’च्या वाढत्या वापराला लोकशाहीतील एक नवी सुरुवात असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. त्यातही मतदार जेव्हा उमेदवारांचे कार्य आणि त्यांच्या प्रतिमेपासून समाधानी नसतात, तेव्हा ते ‘नोटा’चा वापर करतात. राजकीय पक्षांसाठी हा एक इशारा आहे. सर्व पक्षांना मतदारांचा रोष समजून घेण्याची गरज आहे. वेळेत याकडे लक्ष दिले गेले नाही तर याचा वाईट परिणाम होईल, अशी शक्यताही वर्तविली जात आहे. ठाण्यात चार प्रभागांचा मिळून एक वॉर्ड झाला असल्याने त्यातील एक ते दोन उमेदवार हे मतदाराचे परिचायचे दिसले असून उर्वरित परिचय नसलेल्या उमेदवारांना नापंसतीच दिल्याचे या निकालावरुन दिसत आहे. ईव्हीएम मशिनमध्ये नोटाचा पर्याय उपलब्ध झाल्याने अधिक प्रमाणात नागरिकांकडून नोटाचा वापर केला आहे. ज्या प्रभागांकडे ‘नोटा’चा वापर केला आहे, तेथे निश्चित स्वरु पात उमेदवारांविरोधात मतदारांनी असंतोष व्यक्त केल्याचे दिसत आहे
दरम्यान ठाण्यातील ३३ प्रभागामधील प्रभाग क्रमांक ७ ब मध्ये, तब्बल १८४७ मतदारांनी ‘नोटा’ला पसंती दिली आहे. तर प्रभाग क्रमांक २२ अ,ब,क आणि ड मिळून तब्बल ४१२५ मतदारांनी ‘नोटा’ला पसंती दिली आहे.
यामध्ये २२ अ मध्ये १३७१, ब मध्ये १०४४, क मध्ये १०७६ आणि ड मध्ये ६३४ असे प्रमाण आहे. तर ९ अ मध्येदेखील १३६८, ११ अ मध्ये १००४, १ अ मध्ये १२२२, ५ ब मध्ये १०४८, १६ ब मध्ये १०७०, १९ अ मध्ये १३२५, २० ब मध्ये १०३५,क मध्ये १०७८, अशा प्रकारे एकूण ८१ हजार ८८८ मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय निवडला आहे. भविष्यात हे प्रमाण असेच राहिले तर उमेदवाराला धोकाही संभावण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Thane's 81 thousand voters prefer 'Nota'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.