ठाण्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल; ३२३ रुग्णांची नोंद तर, ८ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 07:27 PM2020-12-15T19:27:28+5:302020-12-15T19:28:50+5:30
ठाणे जिल्ह्यातील ठाणे महानगर पालिका हद्दीत ९० बाधितांची तर, २ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.
ठाणे : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्या कमी होताना दिसत आहे. मंगळवारी ठाणे जिल्ह्यात ३२३ रुग्णांची तर ८ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या २ लाख ३६ हजार ८७९ तर, मृतांची संख्या आता ५ हजार ८३१ झाली आहे.
ठाणे जिल्ह्यातील ठाणे महानगर पालिका हद्दीत ९० बाधितांची तर, २ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधितांची संख्या ५३ हजार ६१७ तर, १२७५ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ५२ रुग्णांची तर, ३ जणाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवलीत ७८ रुग्णांसह एकाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.
मीरा भाईंदरमध्ये १९ रुग्णांची नोंद झाली आहे. तर एकाचा मृत्यू झाला आहे. भिवंडी महापालिका क्षेत्रात ५ रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच उल्हासनगरमध्ये १० रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. अंबरनाथमध्येही ११ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. बदलापूरमध्ये ३४ रुग्णांची नोंद करण्यात आली. तसेच, ठाणे ग्रामीण भागात २४ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर एकाचा मृतुची नोंद जाली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या १८ हजार ५०१ झाली आहे. तर मृतांचा आकडा ५७२ झाला आहे.